आपला जिल्हापुणेमहाराष्ट्रविधानसभा निवडणुक

आ. बाळासाहेब थोरात मंगळवारी 29 ऑक्टो. रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार

संपादक मनिष जाधव 9823752964

आ. बाळासाहेब थोरात मंगळवारी 29 ऑक्टो. रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार

खा. निलेश लंके, खा. भाऊसाहेब वाकचौरे ,मा. आमदार डॉ.सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे यांची उपस्थिती
संगमनेर (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे सुसंस्कृत नेते तथा राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात हे मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वा. संगमनेर  प्रांताधिकारी कार्यालय येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
थोरात

आमदार बाळासाहेब थोरात हे 1985 पासून संगमनेर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आहे. मागील 8 वेळेस ते विक्रमी मताधिक्याने विजयी झाले असून यावेळेस 9 व्या वेळेस विधानसभेचा अर्ज भरणार आहे.  सर्वांना सोबत घेऊन सहकार, समाजकारण, शिक्षण, ग्रामीण विकास या सर्व क्षेत्रांमध्ये सातत्याने काम करून हा तालुका राज्यासाठी आदर्शवत मॉडेल बनवला आहे. याचबरोबर राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण अशी विविध महत्त्वाची खाती भूषवताना या सर्व खात्यांना लोकाभिमुख बनवले आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला असून काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले आहे . सध्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य असून राज्याच्या महाविकास आघाडीची समन्वयाची जबाबदारी आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे.

तालुक्यातील प्रचाराची जबाबदारी युवा नेत्या डॉ जयश्रीताई थोरात व तालुक्यातील सर्व पदाधिकारी  सांभाळत आहेत. आमदार थोरात हे आपला उमेदवारी अर्ज मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर 20 24 रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी दाखल करणार असून यावेळी खासदार निलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मा.आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ प्रभावती ताई घोगरे ,डॉ जयश्रीताई थोरात यांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ,आरपीआय व महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत

तरी अर्ज भरण्यासाठी संगमनेर तालुक्यातील सर्व युवक ,नागरिक ,महिला भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे असे आवाहन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ,आरपीआय व महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांनी केले आहे

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

× आपणांस काय सहकार्य करू