
आशुतोष दादांचा हाडाचा कार्यकर्ता – मंदार पहाडे
नमस्कार,
मी सचिन परदेशी
आज मी माझ्या जिवलग मित्राबद्दल काही शब्द लिहू इच्छितो – मंदार पहाडे.फक्त मित्र म्हणून नाही तर समाजासाठी झटणारा, आपल्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे काम करणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो.
कार्यकर्ता कसा असावा?
निष्ठावंत, एक वचनी, प्रामाणिक, कष्टाळू, आणि आपल्या नेत्याबद्दल निखळ श्रद्धा असणारा.
हे सर्व गुण जर कोणामध्ये दिसतात, तर तो म्हणजे मंदार पहाडे.

कोपरगावचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदारने सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करताना एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दादांच्या तोंडून शब्द पडायचा अवकाश, आणि मंदार तो शब्द आपल्या जबाबदारीप्रमाणे स्वीकारून ती जबाबदारी पूर्ण ताकदीने पार पाडायचा – ही त्याची खरी ओळख आहे.
प्रामाणिकपणा, मेहनत, जिद्द, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्वांसोबत आपुलकीने वागण्याची वृत्ती हे त्याचे खरे बळ आहे. कार्यकर्ता असूनही तो प्रत्येकाशी असा वागतो जणू तो त्यांच्या कुटुंबातीलच एक सदस्य आहे.
आजच्या राजकारणात जेथे निष्ठा दुर्मिळ झाली आहे, तिथे मंदार हा निष्ठा, सचोटी आणि काम करण्याची प्रामाणिक इच्छा याचा उत्तम नमुना आहे.
आता निवडणुकीचा काळ जवळ येतो आहे. म्हणून मी आशुतोष दादांना मनापासून विनंती करतो की, अशा एका निष्ठावंत कार्यकर्त्याला – मंदार पहाडेला – शहराचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी. त्या संधीचे तो सोनं करेल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.
मंदार , तुझ्या पुढील वाटचालीसाठी मी तुला मनापासून शुभेच्छा देतो. तुझं भवितव्य उज्ज्वल होवो, आणि तुझ्या कष्टातून व प्रामाणिक कार्यातून कोपरगावला एक नवी दिशा मिळो, हीच माझी मनापासून इच्छा आहे.
🌹शुभेच्छुक,
सचिन परदेशी