‘आत्मा मालिक संकुलात ‘आत्माविष्कार’ सांस्कृतिक सोहळ्याची दिमाखदार सुरुवात’
कोपरगाव प्रतिनिधी – कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा भव्यदिव्य *‘आत्माविष्कार’ सांस्कृतिक सोहळा* मोठ्या जल्लोषात सुरू झाला आहे. “दिनांक २१ जानेवारी ते २६ जानेवारी २०२६ ” या कालावधीत नृत्याविष्कार, संगीत महोत्सव, महानाट्य, बालनाट्य तसेच खाद्यपदार्थ मेळा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प.पु.सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या आशीर्वादाने हा सोहळा भव्य स्वरूपात साजरा करण्यात येत असून विद्यार्थी उत्स्फूर्त सहभागातून सर्व कार्यक्रमांचा आनंद घेत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांनी दिली.
प.पु.सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या आशीर्वादाने हा सोहळा भव्य स्वरूपात साजरा करण्यात येत असून विद्यार्थी उत्स्फूर्त सहभागातून सर्व कार्यक्रमांचा आनंद घेत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांनी दिली.

दि. “२१ जानेवारी”रोजी बालनाट्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास सिनेअभिनेत्री”अपुर्वा चौधरी’ व ‘अमोल दोरुगडे’ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
दि. “२२ जानेवारी” रोजी वार्षिक पारितोषिक वितरण व संगीत महोत्सव भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी कोकणातील सुप्रसिद्ध गायक ‘ऋषी नार्वेकर’, कोपरगावचे पोलीस निरीक्षक ‘रामकृष्ण कुंभार’* व’संदीप कोळी’ उपस्थित होते.
दि. “२३ जानेवारी”रोजी सकाळी आत्मा मालिक मेळा उत्साहात संपन्न झाला. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचा मनसोक्त आनंद घेतला. या मेळ्याचे उद्घाटन ‘श्री. जितेंद्र लक्ष्मणराव भोपळे’, संचालक नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

आगामी कालावधीत भव्य पारितोषिक वितरण समारंभ तसेच ‘ज्योतिर्लिंग’ व ‘महाभारत’ ही महानाट्ये सादर होणार असून यामध्ये हजारो विद्यार्थी कलाकार म्हणून सहभाग घेणार आहेत.
या सर्व कार्यक्रमांसाठी आत्मा मालिक ध्यानपीठाचे सर्व संत व संत माता, संस्थेचे अध्यक्ष ‘श्री. नंदकुमार सूर्यवंशी’ उपाध्यक्ष’ बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन,प्रकाश गिरमे,प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक, सुधाकर मलिक, हिरामण कोल्हे वसतिगृह व्यवस्थापक ,साईनाथ वर्पे,मीरा पटेल, सांस्कृतिक प्रमुख आत्मदर्शन बागडे प्राचार्य निरंजन डांगे,माणिक जाधव,संदीप गायकवाड,नामदेव डांगे,मीना काकडे,नितीन सोनवणे व यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














