आपला जिल्हामहाराष्ट्र

आत्मा मालिकमध्ये ३१ जाने २०२६ ला मेस्टाचे भव्य राज्यस्तरीय अधिवेशन! शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्टतेचा सन्मान

मनिष जाधव 9823752964

आत्मा मालिकमध्ये ३१ जाने २०२६ ला मेस्टाचे भव्य राज्यस्तरीय अधिवेशन! शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्टतेचा सन्मान

कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – मेस्टाचे ११ राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी येथे 31 जानेवारी 2026 ला आयोजित केले असून या अधिवेशनाला हजारो संस्थाचालक उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉ. संजयराव तायडे पाटील (संस्थापक अध्यक्ष मेस्टा) यांनी दिली.

ऊ
महाराष्ट्र राज्यामध्ये इंग्रजी शाळा चालवणाऱ्या संस्थाचालकांची एकमेव संघटना असलेल्या महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे (MESTA) ११ वे राज्यस्तरीय अधिवेशन आत्मा मालिक ध्यानपिठ संस्था, कोकमठाण, शिर्डी- कोपरगाव रोड जि. अहिल्यानगर येथे 31 जानेवारी 2026 रोजी होऊ घातले आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयराव तायडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या अधिवेशनाचे उद्घाटक राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. ना. दादाजी भुसे हे राहणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील हे असणार आहेत. या कार्यक्रमाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, उत्तर महाराष्ट्र शिक्षक मतदार संघाचे आमदार किशोरजी दराडे, भारतीय जनता पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अनिल गावंडे तसेच राज्यातील संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. नामदेवराव दळवी, राज्य कार्यकारणी प्रमुख विनोद कुलकर्णी, अभिजित देशमुख, अनिल असलकर, विश्वजित चव्हाण, मनिष हांडे, शिक्षण तज्ञ सचिन जोशी, सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, हजारोंच्या संख्येने शिक्षक व शिक्षण प्रेमी उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याकरिता विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन होणार असून इंग्रजी शाळांना येणाऱ्या विविध अडचणी संघटनेच्या वतीने मंत्री महोदयांसमोर मांडल्या जाणार आहेत व विविध प्रश्नांची सोडवणूक या माध्यमातून केली जाणार आहे. शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींचे जिवन गौरव पुरस्कार तसेच उत्कृष्ट संस्था, संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक असे विविध पुरस्कार वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. अधिवेशनाला लागून भव्य शैक्षणिक प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. या अधिवेशनाचा जास्तीत जास्त संस्थाचालक, पालक, शिक्षक व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे तसेच अधिवेशनासाठी आत्मा मालिक संस्थेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती  आत्मा मालिक संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी दिली. तसेच या कामी आत्मा मलिक संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकर मलिक नियोजनासाठी मार्गदर्शन करत आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!