Uncategorized

‘’आत्मा मालिकच्या विद्यार्थ्यांनी मिळवली दीड कोटी रुपयांची शिष्यवृत्ती ’’एन.एम.एम.एस.शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत 159 व सारथी  शिष्यवृत्तीसाठी 166 विद्यार्थी पात्र

मनिष जाधव 9823752964

‘’आत्मा मालिकच्या विद्यार्थ्यांनी मिळवली दीड कोटी रुपयांची शिष्यवृत्ती ’’एन.एम.एम.एस.शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत 159 व सारथी  शिष्यवृत्तीसाठी 166 विद्यार्थी पात्र

कोपरगाव मनिष जाधव – राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती ( एन.एम.एम.एस.)परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाचे 159 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत.

उ

राज्यात एका शाळेतील सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा मान आठव्यांदा   आत्मा मालिक ने मिळवला या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये अशी पाच वर्षांमध्ये प्रत्येकी 60000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. 159  विद्यार्थ्यांना 95 लाख 40 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. आज पर्यंत या परीक्षेच्या माध्यमातून आत्मा मालिकच्या १२९३ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून साडेसहा कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळवली आहे. तसेच 166 विद्यार्थी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले असून  त्यांना एकूण  63 लाख 74 हजार 400 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. अभ्यासक्रमाचे योग्य नियोजन, तयारीसाठी ज्यादा वर्ग, नैदानिक चाचण्या, सराव चाचण्या जोडीला विद्यार्थी व शिक्षकांची मेहनत यामुळे हे यश मिळाले आहे . मिशन गरुडझेप वर्षभर राबविल्याने हे उद्दिष्ट साकार झाले असे प्राचार्य निरंजन डांगे यांनी सांगितले.

यशस्वी विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख रवींद्र देठे,सचिन डांगे, सागर अहिरे, अनिल सोनवणे, रमेश कालेकर, मीना नरवडे  विषय शिक्षक सुनील पाटील ,राहुल जाधव, राजेंद्र जाधव, नितीन अनाप, बाळकृष्ण दौंड,  पुनम राऊत,अनिता कोल्हे,नयना आदमाने, किशोर बडाख,शेळके सोपान, संतोष भांड, सचिन जगधने,देठे आशा,जावळे अश्विनी, भुजाडे सर्जेराव,लोंढे वनिता,सातव मीना ,जपे बबन, कराळे बाळासाहेब , सौ.कराळे सुनंदा, सौ.पिंगळे राजश्री, कहांडळ संजय, शिवम तिवारी,बेलोटे मिना, सोमासे वर्षा, मस्के ज्ञानेश्वर, गाढे रूपाली, गणेश कांबळे, वायखिंडे पांडुरंग, पोतदार  प्रतीक्षा, शिंदे संदीप यांचे मार्गदशन लाभले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे परमपूज्य आत्मा मालिक माऊली यांच्या कृपाशीर्वादासह अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी,सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे साहेब, विश्वस्त  प्रकाश भट, प्रकाश गिरमे, बाळासाहेब गोर्डे, प्रभाकर जमधडे, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक सर, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे सर यांनी अभिनंदन केले.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!