अहिल्यानगर जिल्हा बँक असोसिएशनचे शनिवारी संगमनेर येथे सहकारी बँक संमेलन — सत्येन मुंदडा
संगमनेर प्रतिनिधी – अहिल्यानगर जिल्हा बँक असोसिएशन ने येत्या शनिवारी व रविवारी दोन दिवसीय सहकारी बँक संमेलन मालपाणी हेल्थ क्लब संगमनेर येथे आयोजित केलेले आहे. संमेलनाच्या उद्घाटनास आमदार अमोलजी खताळ ,आमदार सत्यजितजी तांबे, सहकारी बँकेतील राज्याचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.

या संमेलनात विविध प्रकारचे ज्ञानसत्र , आंतरबँक क्रीडा स्पर्धा , आयटी मीट , मनोरंजन इ चे आयोजन केले आहे.

या संमेलनात ए आय चा सहकारी बँकेत वापर , सायबर सेक्युरिटी , बँकिंग यशाचे मंत्र इत्यादी विषयावर ज्ञानसत्र तसेच सर्व बँकेतील माहिती तंत्रज्ञान विभागातील अधिकाऱ्यांचा मेळावा संमेलनात होणार आहे.या संमेलनात जिल्ह्यातील 30 बँकातील प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. अशी माहिती असोसिएशनचे चेअरमन सत्येन मुंदडा व संमेलन समन्वयक प्रकाश राठी व श्री सुधाकरजी जोशी यांनी दिली.














