अवैध धंद्याबाबत कोल्हेंनी कधी प्रामाणिक विरोधकाची भूमिका निभावली का नाही? -कृष्णा आढाव
आ.आशुतोष काळेंनी घेतलेल्या भूमिकेशी सहमत नाही का?-कृष्णा आढाव
कोळपेवाडी वार्ताहर :-कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहरातील अनेक अवैध धंदे कायमचे बंद व्हावेत यासाठी आ.आशुतोष काळे यांनी सहा वर्षाच्या कार्यकाळात अनेक वेळा पोलीस व महसूल प्रशासनासमवेत बैठका घेवून अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना दिल्या.परंतु त्यावेळी त्यावर जुजबी कार्यवाही होवून काही काळानंतर या धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट होत असे. हे नित्याचेच होवून त्याचा त्रास सर्वसामान्य नागरीकांना होवू लागल्यामुळे अखेर आ.आशुतोष काळे यानी थेट राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजीतदादा पवार, महसूलमंत्री ना.चंद्रशेखरजी बावनकुळे यांना निर्वाणीचा निवेदन देवून अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी केली व वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा ईशारा दिलेला आहे. मात्र या सहा वर्षात अवैध धंद्याबाबत मा.आ.कोल्हेंनी किमान प्रामाणिक विरोधकाची भूमिका का निभावली नाही? असा सवाल करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव यांनी मा.आ.कोल्हेंनाच कोंडीत पकडले आहे.

त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहरातील अवैध व्यवसाय आज ना उद्या बंद होतील अशी आ.आशुतोष काळे यांनी आशा बाळगली होती. परंतु या व्यवसायाला पोलीस व महसूल प्रशासनाच्या मिळणाऱ्या पाठबळामुळे हे व्यवसाय करणारे व्यक्ती कोपरगाव शहरातील नागरीकांनाच दमदाटी करू लागल्यामुळे हे अवैध व्यवसाय मुळासकट उध्वस्त करायचेच या उद्देशातून आ.आशुतोष काळे यांनी अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी केली आहे. आपले अवैध व्यवसाय बंद होणार असल्यामुळे आता करायचे काय? अशी चिंता अवैध व्यवसायिकांना वाटू लागल्यामुळे त्यांची मदत घेणाऱ्या कोल्हेंना त्याचा फटका अगोदरच पराभवाच्या छायेत असलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत बसू नये याची भीती वाटत आहे.
कोपरगाव शहराला पडलेल्या अवैध व्यवसायाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी वेळोवेळी अवैध धंद्याबाबत अनेक वेळा बैठका घेवून पोलीस प्रशासनाला सूचना देऊनही कठोर कारवाई होत नसल्याने थेट राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजीतदादा पवार, महसूलमंत्री ना.चंद्रशेखरजी बावनकुळे यांना निवेदन दिले आहे. अवैध धंद्यांचा बिमोड करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी मोठे पाऊल उचलले आहे. परंतु मा.आ. कोल्हे व स्वयंघोषित नेते जे कधीही कोणतीही निवडणूक लढवून निवडून आलेले नाही त्या नेत्यानेही कधी अवैध धंद्यांच्या विरोधात अशी भूमिका घेतलीच नाही व कधीही विरोधक म्हणून आपली भूमिका त्यांनी मांडली नाही. कोपरगावातून अवैध धंदे हद्दपार करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजीतदादा पवार, महसूलमंत्री ना.चंद्रशेखरजी बावनकुळे यांना यांना निवेदन देवून आ.आशुतोष काळे यांनी या अवैध धंद्यांच्या विरोधात नुसता आवाजच उठवला नाही तर आंदोलन करण्याची ठोस भूमिका घेतली आहे त्याचे कोपरगावकरांनी स्वागत केले हे कोल्हेंना कुठे तरी खटकले आहे. मा.आ.कोल्हे यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या नावे चुकीचे आरोप करून जो कार्यकर्ता त्यांच्या पक्षासाठी नावडता आहे.ज्याला कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीची गोळा बेरिज करण्यासाठी त्याचा प्रभाग सोडून दुसरीकडे उमेदवारी दिली आहे ती कशासाठी दिली हे सगळ्यांनाच माहित आहे याच्यातच सगळे आले बाकी कोपरगावकर समजदार आहेत असे शेवटी कृष्णा आढाव यांनी म्हटले आहे.
आ.आशुतोष काळे यांनी अवैध धंद्याबाबत जी कठोर आणि निर्णायक भूमिका घेतली तशी भूमिका तुम्ही तुमच्या कार्यकाळात कधी घेतली का? मा. आ. स्नेहलता कोल्हे व त्या स्वयंघोषित नेत्याने जो नेता कधीही कोणतीही निवडणूक लढवून निवडून आलेला नाही तो नेता आ. आशुतोष काळे यांनी घेतलेल्या भूमिकेशी तुम्ही सहमत नाही का? -कृष्णा आढाव.














