अबब…! ५१ किलो चा केक कापून विवेक भैय्या कोल्हे यांचा खडकी मध्ये वाढदिवस साजरा
जेसीबी ने फुलांची उधळुन करत विवेक भैय्यांवर शुभेच्छांचा वर्षाव
कोल्हे कट्टर समर्थक कैलास सोमासे आयोजित कार्यक्रमाची शहरभर चर्चा
कोपरगाव प्रतिनिधी – राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करताना पाठीवर थाप मारून बळ देणाऱ्या नेत्यांची गरज असते. जिल्ह्यात ज्येष्ठ नेते माजी मंत्री, सहकार महर्षी,स्वर्गीय श्री.शंकररावजी कोल्हे साहेब यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडविले. त्यांचा वारसा त्यांचे नातू युवा नेते विवेकभैय्या बिपीन दादा कोल्हे यांनी जपला आहे. प्रचंड ध्येयवाद, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव,आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीत त्यांनी जनमाणसांत वेगळे स्थान निर्माण केले आहे. महापूर,कोरोना यांसारख्या संकटात ते जनतेच्या मदतीला धावून आले. जिल्ह्याच्या विकासाच्या नवनव्या संकल्पना ते मांडत आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देऊन त्याला उभे करण्याचे काम ते करतात.
औद्योगिक वसाहत कोपरगाव चे चेअरमन ते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन,अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक,राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे संचालक अशी गरुडझेप घेणाऱ्या नेतृत्वाचा कोपरगाव येथील खडकी भागातील सामाजिक कार्यकर्ते, कोल्हे गटाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे कैलास सोमासे यांनी विवेक भैय्या कोल्हे यांना वाढदिवसाची अनोखी भेट म्हणून ५१ किलो केक कापण्यात आला तसेच जेसीबी ने फुलांची उधळुन अनोखा पध्दतीने वाढदिवस साजरा करण्यात आला असल्याची चर्चा कोपरगाव तालुक्यात चांगलीच रंगली आहे.
यावेळी कैलास सोमासे दिपक जपे राहूल खरात मारुती जपे यूनस भाई शेख निलेश डोखे शाम शेवते पपू दिवेकर सचीन पवार खंडू वाग सार्थक चव्नके अभीद शेख आकाश दिवेकर गणेश गवारे माऊली जाधव, राजू भाई शेख, वीजु बोर्डे, अप्पा अराख, वीजू नाना मूगसे, रवी वाहूळ, संतोष खैरनार, बबलू मूगसे, गणेश सोमासे, लक्ष्मण पाटनकर, लक्ष्मण भालेराव , संजय पवार यांच्यासह नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.