अकाली निधनाने ” दादांचे ” गोदावरी दूध संघावर येणे राहूनच गेले…- राजेश परजणे पाटील
ll भावपूर्ण श्रध्दांजली ll
राजकारण, समाजकारण व सहकार क्षेत्रातील अत्यंत जाणकार व अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात झालेले निधन मनाला चटका लावून गेले.
महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या (महानंद) अध्यक्षपदाच्या माझ्या निवड प्रकियेपासून ते महानंदला उर्जितावस्थेत आणण्यासाठी आर्थिक तरतूद मंजूर करुन महानंद एन. डी. डी. बी. कडे हस्तांतरण करणेपर्यंत अजितदादांचा मोलाचा वाटा होता.

गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील सहकारी दूध उत्पादक संघाला ५० वर्षे पूर्ण झाले तेव्हा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी दि. ६. ऑगस्ट २०२५ रोजी दादांची मंत्रालयात समक्ष भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी २० जानेवारीला मंगळवार असून त्या दिवशी कॅबिनेट मिटींग असते. दि. १८ जानेवारीला तयारी असेल तर येतो असे आश्वासनही त्यावेळी त्यांनी दिले होते. पुढे नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्याने त्यांचे येणे झाले नाही. त्यानंतर दादांनी आदरणीय आण्णांच्या पुण्यस्मरण सोहळ्यासाठी येण्याचे कबूल केले होते. परंतु आता त्यांच्या अकाली निधनाने गोदावरी दूध संघावर येणे थांबून गेले आहे.
दुग्ध व्यवसायातील अत्यंत जाणकार व्यक्तिमत्व हरपल्याने सहकारासह राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झालेली आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकरी व सहकारी दूध संघांच्यावतीने अजितदादांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करुन परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो अशी प्रार्थना करीत आहे.
राजेश नामदेवराव परजणे पाटील














