आपला जिल्हा

अंगणवाडीमधील गणवेश वाटपाचा आदर्शवत अभिनव उपक्रम – शेजूळ

संपादक मनिष जाधव 9823752964

अंगणवाडीमधील गणवेश वाटपाचा आदर्शवत अभिनव उपक्रम – शेजूळ
अंगणवाडीमधील मुलांमध्येच बिट्टूचा वाढदिवस!

नेवासा प्रतिनिधी मोहन गायकवाड – नेवासा तालुक्‍यातील गोंडेगाव येथील अंगणवाडी शाळेतील मुलांना प्रजासत्ताक दिनानिमित्ताने गणवेशाचे वाटप करण्यात आले. जाधव कुटूंबियांच्या वतीने गोंडेगाव च्या अंगणवाडी मधील गरिब विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य भेट देऊन खऱ्या अर्थाने समाजाला आदर्शवत ठरेल असा अभिनव उपक्रम राबविण्यात आल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ शेजूळ यांनी केले.

अंगणवाडीमधील गणवेश वाटप
अंगणवाडीमधील गणवेश वाटप

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गोंडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक जाधव कुंटूबियांच्यावतीने अंगणवाडीमधील गोरगरिब मुलांना शालेय साहित्य व गणवेशाचे वितरण करण्यात आले. तसेच या मुलांमध्येच एक वर्षांच्या सुजित उर्फ बिट्टू सचिन जाधव याचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.
गणवेश वितरण प्रसंगी अंगणवाडी सेविका सौ. अलकाताई शेजुळ यांनी उपस्थितांचे स्वागत करून अंगणवाडी मधील कामकाजाची माहिती सांगितली. तर सचिन जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव जाधव , कृषी मंडळाधिकारी कल्याण शेजुळ, विकास आठरे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास महादेव आहेर, आरगडे सुहास आहेर मनू शुळ, वसंतराव आहेर, कैलास शिंदे, प्रदिप जाधव, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गजभज सर, गोरे सर, तांबे सर, वाघ सर, म्हस्के सर, भुजबळ सर, पर्यवेक्षिका भावना पवार, गव्हाणे सर आदि उपस्थित होते. नितीन जाधव यांनी आभार मानले.

ग्रामीण भागात एक चांगला पायंडा समाजात रुजावा म्हणून हा आदर्शवत उपक्रम राबविला असल्याने जाधव मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी
धन्यवाद दिले.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!