
भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयात दहावी विद्यार्थी-पालक-शिक्षक संयुक्त मेळावा उत्साहात
संगमनेर प्रतिनिधी – भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयामध्ये इयत्ता दहावीचा विद्यार्थी शिक्षक पालक मेळावा संपन्न. शनिवार दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी सकाळी साडेआठ वाजता भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयाच्या लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात सभागृहामध्ये इयत्ता 10 वी चे विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता .


यावेळी मागील वर्षापासून होणाऱ्या इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी भाऊसाहेब गुंजाळ पाटील जुनियर कॉलेजचे सायन्स विभाग प्रमुख श्री घोरपडे सर वाणिज्य विभाग प्रमुख श्री अमोल दातीर सर आणि कला विभाग प्रमुख श्रीमती कुटे मॅडम उपस्थित होते. त्यांनी भविष्यातील विद्यार्थ्यांना उपलब्ध असणाऱ्या करियर संधी आणि अकरावीचे प्रवेश घेताना घ्यावयाची काळजी याविषयीचे सखोल मार्गदर्शन केले. जूनियर कॉलेज वर उपलब्ध असणाऱ्या मोफत प्रवेश प्रक्रिया मदत केंद्राची तसेच करियर गायडन्स कट्टा टॅली अभ्यासक्रम नीट आणि JEE परीक्षांचे मार्गदर्शन त्याच्याशी निगडित असलेल्या भविष्यातील करियर संधींची माहिती दिली. यानंतर पालक मेळाव्याला सुरुवात झाली.

या मेळाव्याचे प्रास्ताविक विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सौ दिघे मॅडम यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांनी एस एस सी परीक्षेचा अभ्यास कसा करावा. परीक्षेच्या कालावधीमध्ये आहार आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले तसेच पालक वर्गाकडून अपेक्षित असलेल्या शिस्त ,अभ्यास आणि विद्यार्थ्यांची प्रगती याबाबत करावयाच्या उपाययोजना मौलिक मार्गदर्शन आणि सूचना केल्या. उपस्थित विद्यार्थ्यांना पैकी काही विद्यार्थ्यांनी या वेळेस आपले मनोगते व्यक्त केली. यावेळी पूर्व परीक्षेत गुणानुक्रमे पहिल्या पाच आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या मेळाव्यास उपस्थित असलेल्या काही पालक बंधू-भगिनींनी सुद्धा आपली मनोगते या वेळी व्यक्त केली . विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विद्यालयात जे विविध उपक्रम राबवले गेले त्याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय एस एम खेमनर सर यांनी अध्यक्षपदावरून बोलताना विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा, विद्यालयात वर्षभर राबविल्या गेलेल्या विविध उपक्रम, विविध स्पर्धा, गुणवत्ता विकास परीक्षा,शासकीय चित्रकला परीक्षा ,स्कॉलरशिप परीक्षा या विषयी मार्गदर्शन केले. पुढील काळात होणाऱ्या बोर्ड प्रात्यक्षिक परीक्षा ,तोंडी परीक्षा आणि सराव परीक्षा क्रमांक दोन याच्या नियोजनाची सखोल माहिती देऊन ,विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी करावयाच्या उपाययोजनांचे मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयाचे प्रभारी पर्यवेक्षक श्री .दिघे अण्णा सर इयत्ता दहावीच्या वर्गांचे वर्ग शिक्षक अभंग रवींद्र सर,ढोले मीरा मॅडम, शेळके सर,आल्हाट किरण सर देशमुख सीमा मॅडम,रहाणे मॅडम , मोठ्या संख्येने पालक बंधू भगिनी आणि दहावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षिका प्रतिनिधी देशमुख यांना केले. तर सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले.














