Uncategorized

प्रसाद नाईक यांच्या दूरदृष्टीतून साकारलेले “रचना स्क्वेअर”

मनिष जाधव 9823752964

प्रसाद नाईक यांच्या दूरदृष्टीतून साकारलेले “रचना स्क्वेअर”

नाईक बिल्डर्सच्या प्रगतीचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा

कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव  शहराच्या विकासाला नवी चालना देणाऱ्या “रचना स्क्वेअर” या अत्याधुनिक व्यावसायिक संकुलाचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. नाईक बिल्डर्सतर्फे साकारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे कोपरगावच्या व्यापारी व नागरी विकासात मोलाची भर पडणार आहे.

ए

 

शनिवार, दि. २८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता या संकुलाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या शुभहस्ते तसेच गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेशजी परजणे पा. , माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, नगराध्यक्ष पराग संधान, मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्यासह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित उद्घाटन होणार आहेत.

या प्रकल्पामागे नाईक बिल्डर्सचे संस्थापक संचालक प्रसाद नाईक यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व अधोरेखित होते. आधुनिक वास्तुरचना, उत्कृष्ट दर्जा आणि ग्राहकाभिमुख दृष्टिकोन यांचा समन्वय साधत त्यांनी कोपरगावमध्ये विश्वासार्ह बांधकाम व्यावसायिक म्हणून आपली ठाम ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यातून केवळ इमारती नव्हे, तर शहराच्या विकासाला गती देणारी केंद्रे उभी राहत आहेत.

ऊ

“रचना स्क्वेअर” हे संकुल आधुनिक सुविधा, प्रशस्त जागा आणि व्यावसायिक गरजांना अनुरूप डिझाइन यामुळे व्यापाऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळून कोपरगावच्या आर्थिक घडामोडींना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नाईक बिल्डर्सतर्फे सर्व नागरिकांना या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!