आपला जिल्हानाशिक

नाशिक येथे गुरु आराध्या फाउंडेशनचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात

मनिष जाधव 9823752964

1

नाशिक येथे गुरु आराध्या फाउंडेशनचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात

नाशिक प्रतिनिधी – गुरु-आराध्या फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने रविवार, दि. १ मार्च २०२६ रोजी नाशिक येथे फाउंडेशनचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

2या कार्यक्रमात सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संचालित भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनियर कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य किसन गंगाधर खेमनर यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. विविध विद्यालयांमध्ये नियमित अध्यापनाबरोबर अतिरिक्त तास घेऊन विद्यार्थ्यांना दिलेले मार्गदर्शन, गरीब विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, आर्थिक मदत, उत्कृष्ट निकाल, सामाजिक कार्यातील सहभाग याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

4
तसेच सह्याद्री कॉलेजच्या वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख प्रा. अमोल दातीर यांनाही शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी गेल्या सलग १७ वर्षांपासून इयत्ता अकरावी व बारावी वाणिज्य शाखेत ‘बुक कीपिंग अ‍ॅण्ड अकाउंटन्सी’ विषयाचे अध्यापन केले आहे. शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAFF) अंतर्गत माहिती सुधारण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले असून उच्च माध्यमिक स्तरावर वाणिज्य शाखेतून राज्यस्तरीय निवड मिळवली आहे. विभागप्रमुख म्हणून कार्यरत असताना त्यांनी सह्याद्री ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅली लॅब स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. जिल्ह्यातील अनेक नामांकित ज्युनियर कॉलेजमध्ये त्यांनी अकाउंटन्सी विषयावर अतिथी व्याख्यानेही दिली आहेत.

3
दोन्ही मान्यवरांना फाउंडेशनच्या संस्थापक संचालिका ह.भ.प.डॉ. अर्चनाताई आहेर, संस्थापक सचिव ललित खैरनार सर व संस्थापक खजिनदार भाऊसाहेब आहेर सर, डॉक्टर डी.डी धोंगडे पाटील, बळीराम शिंदे साहेब, महंत अवधूत गिरी महाराज, माननीय पंडित वाल्मीक गोपाल शास्त्री यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या दोन्ही पुरस्कारार्थींच्या शैक्षणिक वाटचालीत
सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरविंद आहेर सर यांचे सेवानिवृत्त प्राचार्य के. जी. खेमनर सर यांच्या जीवनप्रवासात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. आयुष्यातील विविध सुखदुःखांच्या प्रसंगी अरविंद आहेर सर यांनी त्यांना वेळोवेळी मौलिक मार्गदर्शन करून भक्कम आधार दिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच खेमनर सर यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

ऐ
तसेच प्राध्यापक अमोल दातीर सर यांनाही विद्यार्थी दशेपासून ते आजपर्यंत अरविंद आहेर सर यांचे सातत्यपूर्ण व मोलाचे मार्गदर्शन लाभत आले आहे. त्यांच्या प्रेरणादायी सहवासामुळेच दातीर सर यांनी शैक्षणिक क्षेत्रात सातत्य, गुणवत्ता आणि नेतृत्व यांचा उत्कृष्ट आदर्श निर्माण केला असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारण्यासाठी के जी खेमनर सर यांच्या पत्नी सौ पुष्पा खेमनर मॅडम, मुलगा श्री संदीप खेमनर, मल्हारराव होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री सोसे सर, अश्विनीनाथ विद्यालय पारेगाव बु. चे मुख्याध्यापक श्री अशोक भारती सर, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालय डिग्रसचे मुख्याध्यापक श्री पांडुरंग बाचकर सर, श्री कुदळ सर, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

औ
प्रा. अमोल दातीर सर यांच्यासमवेत त्यांचे वडील के. एच. दातीर, आई तारामती दातीर, पत्नी प्रा. वृषाली दातीर, बंधू अनिल दातीर तसेच टी. एस. गव्हाणे सर, प्रा. बी. एस. कुटे, प्रा. एस. एस. घोरपडे, प्रा. एन. एस. गुंड, प्रा. बी. टी. दिघे, प्रा. तुषार गायकर, प्रा. संतोष थोरात, प्रा. प्रभाकर भोकनळ, प्रा. एन. आर. जगताप, प्रा. ज्ञानेश्वर कोहकडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमास शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, गावकरी नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!