पठार भागात युवा संवाद यात्रेचे अभूतपूर्व स्वागत
विरोधक हे फक्त निवडणुकीसाठी येणारे- डॉ थोरात

साकुर पठार भागात विविध गावांमध्ये युवा संवाद यात्रेच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधला तर साकुर मध्ये झालेल्या भव्यसभेच्या बोलत होत्या यावेळी अध्यक्षस्थानी सभापती शंकर पा खेमनर हे होते. यावेळी इंद्रजीत खेमनर, सौ मीराताई शेटे ,मिलिंद कानवडे, नवनाथ आरगडे, सचिन खेमनर, जयराम ढेरंगे, किरण मेंढे यांच्यासह पठार भागातील तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना डॉ. थोरात म्हणाल्या की, 2024 ची विधानसभा निवडणुक ही संगमनेर तालुक्यात महोत्सव मधून साजरी होणार आहे. राज्यामध्ये सर्व पक्षांमध्ये आणि जनतेमध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांचा मोठा आदर असून एक महिन्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्याचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळावी ही प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे .आणि यासाठी संगमनेर तालुक्यातून एक लाखाचे मताधिक्य देण्यासाठी सर्व तालुका सज्ज झाला आहे.
काही बाहेरून विरोधक येतात त्यांना पराभव का पत्करावा लागला याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. आणि तालुक्यातील विरोधक हे फक्त निवडणुकीपुरती येतात निवडणूक झाली की पुन्हा ती दिसत सुद्धा नाहीत हे जनता ओळखून आहे. आमदार बाळासाहेब थोरात ही रात्रंदिवस तालुक्याच्या विकासासाठी काम करतात. जनतेने दिलेल्या संधीचा उपयोग त्यांनी जनतेसाठीच केला असून राज्यभरात संगमनेर तालुक्याचा लौकिक वाढवला आहे.
देश पातळीवर महत्त्वाच्या पदावर संगमनेरचे नेतृत्व काम करत आहे हे प्रत्येकासाठी अभिमानास्पद आहे. येत्या काळात खोट्याभुलथापांना बळी न पडता सर्वांनी आता एकजुटीने आपल्या कुटुंबप्रमुखाच्या पाठीशी भक्कम उभे राहावे असे आव्हान त्यांनी केले
तर शंकर पा खेमनर म्हणाले की, समोर विरोधक कोण आहे. हे जनतेला माहिती नाही आणि जो उमेदवार उभा राहणार आहे त्याला तालुक्यातील वाडी वस्ती सुद्धा माहिती नाही. एक महिन्यानंतर ही मंडळी कुठे दिसणार नाही. आपल्या प्रत्येक कामासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांचा दरवाजा नेहमी खुला असून सर्व जनता ही त्यांच्याच पाठीशी उभी राहणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी विविध गावांमधून डॉ. जयश्रीताई थोरात यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तर बिरेवाडी येथे पारंपारिक घोंगडी पगडी व काठी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. सर्व गावांमध्ये युवक नागरिक महिला व जेष्ठ नागरिकांची लक्षणीय उपस्थिती हे या युवा संवाद यात्रेचे वैशिष्ट्य ठरले आहे..