…तर नागरिकांना मतदान करण्यासाठी विशेष मोहीम राबविणार – मुख्याधिकारी तुषार आहेर
येवला प्रतिनिधी – येवला नगर परिषद येवला विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 स्वीप अंतर्गत येवला नगरपरिषद येथे दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी ठीक दहा वाजता माननीय मुख्यधिकारी तुषार आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची टक्केवारी वाढावी या अनुषंगाने रांगोळी स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते. या रांगोळी स्पर्धेमध्ये येवला शहरातील स्वामी मुक्तानंद विद्यालय एंझोकेम हायस्कूल येवला व कला व वाणिज्य महाविद्यालय येवला येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला .या स्पर्धेचा विषय जागतिक मतदार दिन हा देण्यात आलेल्या होता.
या स्पर्धेमध्ये विद्यार्थिनी तसेच शहरातील महिला भगिनींनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. जनता विद्यालय येथे सुमारे 50 विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला होता.
तसेच येवला नगरपरिषद येथे देखील 26 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला या स्पर्धेचे परीक्षण कर व निरीक्षक श्री रोहित पगार व कविता गीते व उपमुख्यधिकारी चंद्रकांत भोये यांनी केले या स्पर्धेचा आयोजन संदीप बोढरे गौरव चुंबळे शितल शेळके यांनी केले या स्पर्धेसाठी जनता महाविद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब गमे श्री.उटावळे सचिन बोढरे सर सुषमा विखे कोमल कडतन रेखा साबळे यांचे सहकार्य लाभले.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व नागरिकांनी महिलांनी युवक युवतीने आपला मतदानाचा हक्क बजवावा तसेच मतदान टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप अंतर्गत भागात नागरिकांना मतदान करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार.मुख्याधिकारी तुषार आहेरयेवला नगरपरिषद येवला