
सिंधी समाज चैरिटेबल ट्रस्ट कोपरगाव अध्यक्षपदी मनोहर कॄष्णानी यांची निवड
कोपरगाव मनिष जाधव – पूज्य श्री सिंधी समाज कोपरगाव ची बैठक नुकतीच संपन्न झाली व त्यात सर्वानुमते मनोहर कृष्णानी यांची “सिंधी समाज चैरिटेबल ट्रस्ट” या संस्थेच्या अध्यक्षपदी मनोहर कृष्णानी यांची निवड करण्यात आली. सदरची ट्रस्टची कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली.

उपाध्यक्ष- गोविंद (विकी)शर्मा, सचिव- हरिष आर्य, खजिनदार – रिंकेश खुबानी, मुख्य विश्वस्तपदी चेतन खुबानी, विनोद शर्मा, अमित शर्मा व हरेश कराचीवाला यांची निवड करण्यात आली. सदर विश्वस्त मंडळाने लगेचच समजासाठी पुढील काळासाठी करण्यात येणाऱ्या कार्याची माहिती दिली. नवीन कार्यकारणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
