श्रीगोंदयातील अनेक सरकारी नोकर करतात आयकर विभागाची फसवणूक ?
श्रीगोंदा दादा सोनवणे :- श्रीगोंदा तालुक्यातील अनेक सरकारी नोकर पळवाटा शोधून आपले व्यवसाय लपवून आयकर विभागाची फसवणूक करत असल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी काही नागरिकांनी आयकर विभागाचे कार्यालयात तक्रार केल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळत आहे
श्रीगोंदा तालुक्यातील अनेक घरात नवरा बायको दोघेही सरकारी नोकरीत आहेत सरकारी पगारातून काही अंशी आयकर विभागाची कपात होते मात्र त्यात अनेक पळवाटा दाखवून आयकर विभागाची खुलेआम फसवणूक केली जात आहे सरकारी नोकरी करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांचे अनेक व्यवसाय सुरू आहेत त्याची कुठेही नोंद नाही त्याचा कुठेही कर भरला जात नाही यामध्ये अनेक कर्मचारी कामावर आहेत त्यांच्या पगाराचा वार्षिक रक्कम पाहता लाखोंची उलाढाल होताना दिसत आहे तसेच याचबरोबर सरकारी नोकराची खरेदीची शेती वडिलोपार्जित शेती त्यातून निघणारे उत्पन्न याचातर हिशोबच नाही अनेक सरकारी नोकरीत असणाऱ्या अनेकांची लाखो रुपयांची मासिक उलाढाल होते मात्र ती आयकर विभागाला फसवून यासाठी त्यांच्याकडे असणारे अनेक अकाऊंटंट त्यांना पळवाटा काढून देण्यात धन्यता मानत आहे मात्र सरकारी नवरा बायको यांचा पगार व्यवसाईक उत्पन्न तसेच शेतीमधील उत्पन्न असे मिळून मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत आहे मात्र आयकर भरला जातो फक्त सरकारी पगारावर त्यामुळे मोठ्या प्रमाणात आयकर विभागाची फसवणूक केली जात आहे हे आयकर विभागाच्या लक्षात आल्यावर मात्र अनेकांना पळती भुई कमी पडल्याशिवाय राहणार नाही असे अनेकांचे मत आहे.
आधार कार्ड बॅंकखाते संलग्न असल्यास ?सरकारच्या आग्रहानुसार आधार कार्ड बँक खाते पॅनकार्ड सर्व खात्याशी संलग्न केल्यावर कोणत्याही सरकारी नोकराला कोणत्याही प्रकारची माहिती लपवता येणार नाही व याचा आयकर विभागाला माहिती मिळवण्यासाठी सोपे होईल त्यामुळे सरकारने याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे
शिक्षक अग्रेसर ?आयकर विभागाची फसवणूक करण्यास तालुक्यातील माध्यमिक विद्यालयाचे व प्राथमिक विद्यालयाचे शिक्षक मोठ्या प्रमाणावर अग्रेसरअसून यांच्यामार्फत सर्वात जास्त आयकर विभागाची फसवणूक होत असल्याचा आरोप अनेक सज्ञान नागरिकांतून होत आहे