संवत्सर येथे नवनिर्वाचित संचालक पंडित भारुड यांचा सत्कार
कोपरगाव मनिष जाधव – तालुक्यातील कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहत (इस्टेट) सोसायटी लिमिटेड च्या संवत्सर येथील पंडित जमनराव भारुड यांची संचालक पदी निवड झाली.त्यांचा सत्कार शाल श्रीफळ हार फेटा घालून संवत्सर ग्रामस्थांनी केला.
भारुड सर त्यांना भावी कार्याला शुभेच्छा देवून सर्वानी मनोगत व्यक्त केले.त्यावेळी संवत्सर ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य़चे मुकुंद मामा काळे, कोपरगाव तालुका मानवाधिकार कार्याध्यक्ष मोहनराव निकम, प्रगतशील शेतकरी राजुआबा बोरनारे, जयभीम पाणी वाटप सहकारी संस्थेचे संदिप मैंद, दिनेश नाना बोरनारे आदि मान्यवर या वेळी उपस्थित होते. सत्कार केल्या बद्दल समस्त भारुड परिवार यांनी सर्वांचे आभार मानले.तरुण तडफदार नेते विवेकदादा बिपिनदादा कोल्हे व संपूर्ण कोल्हे परिवाराने दिलेली औद्योगिक सहकारी वसाहतमध्ये दिलेली कामाची संधी जबाबदारीने पुर्ण करु असे भारुड यांनी शेवटी आभार मानताना सांगितले.