संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल येथे गीता जयंती निमित्त १५ व्या अध्यायायचे सामूहिक पठण
कोपरगाव(प्रतिनिधी):मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा भगवद् गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा होतो. सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जातो. तो दिवस म्हणजे भारतीय जीवनात श्रेष्ठतम म्हणावा लागेल. या पवित्र दिवासाचे औचित्य साधात संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडिअम स्कूल येथे शिक्षिका वैशाली लोखंडे व ऋतुजा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे व मधुराष्टकाचे सामूहिक पठण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विशाल झावरे, मुख्याध्यापक सचिन मोरे व पत्रकार अनिल दीक्षित यांनी श्रीमद् भगवद् गीतेचे ,ज्ञानेश्वर माऊलींचे व सरस्वतीचे पूजन केले.
त्यानंतर शाळेच्या शिक्षिका भारती हळगावकर मॅडम व शाळेची विद्यार्थिनी साईश्री कानडे यांनी गीता जयंती चे महत्व सर्व विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून सांगितले. तसेच जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात झालेल्या आतंकवादी हल्ल्यात भारतीय लष्कराचे चार जवान शहीद झाले त्यानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी मौन पाळत त्यांना आदरांजली वाहिली.सूत्रसंचालन भक्ती देवडे व सारा शेख यांनी केले तर आभार नुरी प्रज्योतकौर या विद्यार्थिनीनी मानले.