संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी सोहळा!!
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – कोपरगांव तालुका येथील एक नामवंत शिक्षण संस्था संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेत शाळेत मॅनेजिंग ट्रस्टी सौ.रेणुका ताई विवेक भैय्या कोल्हे यांच्या मुख्य उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
यात शाळेतील नर्सरी पासून दहावी वर्गाचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या दिंडीत सहभागी सर्व विद्यार्थी वारकरी वेशात होते.मुख्य म्हणजे या दिंडीत विदयार्थी यांनी विठू नामाचा गजर करत वाट धरली. यात शाळेचे मुख्याध्यापक मोहसिन शेख सर यांनी हिरारीने सहभागी होऊन आनंद घेतला.

अतिशय शिस्त बध्द दिंडी सोहळा झाला. सदर कार्यक्रम नियोजन साठी शिक्षक श्री. बोळींज सर, गिरमे सर, बहिरट सर, कुरेशी सर, दरेकर मॅडम, सुराळकर मॅडम, उगले सर व सर्व शिक्षक,शिक्षीका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.