आपला जिल्हा

शिवजयंती निमित्त न्यू मेडिकेअर हॉस्पिटल व ग्रामपंचायत टाकळी कडेवळीत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरोग्य तपासणी शिबिर संपन्न

संपादक मनिष जाधव 9823752964

शिवजयंती निमित्त न्यू मेडिकेअर हॉस्पिटल व ग्रामपंचायत टाकळी कडेवळीत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरोग्य तपासणी शिबिर संपन्न

दादा सोनवणे श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील न्यू मेडिकेअर हॉस्पिटल व ग्रामपंचायत टाकळी कडेवळीत यांच्या संयुक्त विद्यमाने टाकळी गावातील देशमुख हॉस्पिटल या ठिकाणी भव्य महाआरोग्य मोफत तपासणी शिबिर संपन्न झाले या शिबिरात अनेक गावकऱ्यांनी मोफत तपासणी करून लाभ घेतला आहे.

न्यू मेडिकेअर हॉस्पिटल व ग्रामपंचायत टाकळी

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३वी जयंती निमित्त श्रीगोंदा तालुक्यातील न्यू मेडिकेअर हॉस्पिटल व टाकळी कडेवळीत ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज शिवजयंती निमित्त तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील देशमुख हॉस्पिटल या ठिकाणी भव्य महाआरोग्य मोफत तपासणी शिबिर ठेवण्यात आले होते या शिबिरात नामवंत डॉक्टरांची हजेरी असल्यामुळे अनेक रुग्णांनी तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाण्यास मिळाली या शिबिरासाठी डॉक्टर राहुल सरोदे हृदयरोग तज्ञ, दीपक नळे अस्थिरोग तज्ञ तसेच मच्छिंद्र जांभळे मुळव्याध तज्ञ ,विठ्ठल गवते ,जयेश कदम त्वचारोग तज्ञ, सुभाष देशमुख या नामांतर डॉक्टरांनी या शिबिरासाठी उपस्थिती दाखवली होती या शिबिराची सुरुवात क्षत्रियकुलवंत राजेधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सुभाष देशमुख यांनी केले असून आलेल्या सर्व नामवंत डॉक्टरांचे गावच्या वतीने सत्कार करण्यात आले त्यानंतर गावातील नागरिकांचे मधुमेह रक्तदाब यासह विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात आली त्यामुळे गावातल्या नागरिकांनी या शिबिराबाबत मोठ्या प्रमाणात आनंदाचा क्षण असे उद्गार काढून शिबिराला प्रोत्साहत्मक प्रतिसाद दिला या शिबिराच्या कार्यक्रमात बाबासाहेब इथापे, शंकरराव वाळुंज, विठ्ठल वाळुंज ,माणिक वाळुंज,राजेंद्र खामकर, प्रफुल इथापे ,सुदाम सोनवणे ,आनंदा गिरमे ,अशोक नवले सुदाम नवले ,भरत रणसिंग ,कृष्णा खामकर,भगवान खामकर,पत्रकार दादा सोनवणे यांच्यासह आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!