Uncategorized

विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत शरीराच्या तंदुरुस्ती कडे लक्ष द्यावे- पोलीस निरीक्षक कोळी ; राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

संपादक मनिष जाधव 9823752964

आकाश

विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत शरीराच्या तंदुरुस्ती कडे लक्ष द्यावे- पोलीस निरीक्षक कोळी

राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – आजच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच आपल्या शरीराच्या जडण घडणीकडे लक्ष देत शरीर सुदृढतेवर अधिक भर द्यावा असे आवाहन कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.

एरयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात केंद्र सरकार व महाराष्ट्र शिक्षण परिषदेद्वारा घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केलेल्या करंजी येथील कर्मवीर काळे माध्यमिक विद्यालयातील तेजस गायकवाड, आयुष आगवन, वैभव साळुंखे, गजानन उसरे,श्रेया लांडबिले, हर्षदा पवार, सिद्धी फापाळे, सरस्वती तुपे,निकिता आगवन, वैष्णवी कांबळे,वैष्णवी थोरात तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कोमल ठाकरे व गायत्री निकम या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष मनीष जाधव, करंजी गावचे लोकनियुक्त सरपंच रवींद्र आगवन, संघाचे उपाध्यक्ष फकीरराव टेके, जिल्हासदस्य जनार्दन जगताप, विनोद जवरे, किसन पवार, सोमनाथ डफळ, अमोल गायकवाड यांच्यासह जेष्ठ नागरिक सांडूभाई पठाण, काळे विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनकर माळी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अशोक आहेर आदि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

ऊ

पोलीस निरीक्षक कोळी यांनी याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत प्रत्येकाने शालेय अभ्यासा सोबतच अवांतर वाचनावर तसेच मैदानी खेळावर भर देत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जात आपले व आपल्या गावाचे नाव उज्वल करावे असे सांगितले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कारभारी आगवन, संघाचे कार्याध्यक्ष विजय कापसे, पत्रकार किसन पवार, गोदामाईचे आदिनाथ ढाकणे, आदींनी देखील आपले मनोगत व्यक्त करत गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे तालुकाध्यक्ष मनिष जाधव यांनी करत संघाच्या कार्याची माहिती दिली.

Sai

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षक गजानन सांगळे यांनी तर उपस्थितांचे आभार शालेय शिक्षक ललित जगताप यांनी व्यक्त केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, कर्मवीर काळे विद्यालयाचे संदीप चव्हाण, देविदास झाल्टे,राधाकिसन टाकसाळ, सिद्धार्थ बरडे, सचिन डांगे, सुनिल पिंपळे,अनिल सरोदे,गवनाथ डोखे जिल्हा परिषद शाळेचे हांडे सुमेश, थोरात नंदकुमार,चव्हाण ज्ञानोबा, सांबारे संगिता, गायकवाड सुनिता, शेख सलीम रुबाब, शिंदे शरद, रासकर मोहन, धिंदळे बाळू, नाना पानपाटिल आदी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य आदींनी अथक परिश्रम घेतले तर या प्रसंगी मोठ्या संख्येने पालक व शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!