येवला शहरात पाणीपुरवठा तीन दिवसानंतर- मुख्याधिकारी तुषार आहेर
येवला प्रतिनिधी – येवला नगरपरिषद येवला माननीय मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्या सूचनेनुसार येवला शहरातील नागरिकांना कळविण्यात येते की पालखेड आवर्तनाच्या पाण्याने गंगासागर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने येवला शहरवासियांना दिनांक 11 जून 2025 पासून पाणीपुरवठा नियमित तीन दिवसाआड करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.

गेल्या मे महिन्यामध्ये पाण्याचे पातळी पूर्व खालावल्याने शहरात पाणी कपात करण्यात आली होती येवला शहरात पाच दिवसात पाणीपुरवठा होत होता परंतु पावसाचा पाणी येण्यापूर्वी पालखेड आवर्तनाचे पाणी वेळेत आल्याने येवलाकरांचे पाणी संकट टळले गंगासागर तलाव पूर्ण क्षमतेने भरताचक्षणी मुख्याधिकारी यांनी पाणी पुरवठा विभागाला सूचना दिल्या व नागरिकांना तीन दिवसात पाणी करण्यात आले.