भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय संगमनेर या विद्यालय छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
संगमनेर प्रतिनिधी – भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय संगमनेर या विद्यालय छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य, सह्याद्री प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक, विद्यालयाच्या पर्यवेक्षिका, शिक्षक प्रतिनिधी, शिक्षिका प्रतिनिधी,सर्व ज्येष्ठ शिक्षक, शिक्षकेतर प्रतिनिधी, सर्व शिक्षक, शिक्षिका, सह्याद्री प्राथमिक चे सर्व शिक्षक, विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी, याप्रसंगी उपस्थित होते. विद्यार्थी कु.ज्ञानेश्वरी आहेर , कु. श्रावणी गुंजाळ ,श्रीश आगलावे, चि. आर्यन संदीप खेमनर या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आपल्या भाषणातून छान माहिती सांगितली.
याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षिका सौ. सुरेखा दिघे मॅडम यांनी शिवाजी महाराजांचा जीवनपट याविषयी मार्गदर्शन केले. ज्यु.कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. सुरसे सर.. यांनी जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.
श्री शरद नवले सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा गायन केले , सह्याद्री प्राथमिक च्या शिक्षिका श्रीमती आहेर मॅडम यांनी गीत गायन केले,प्राचार्य खेमनर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री डी.व्ही. गुंजाळ सर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री अण्णासाहेब दिघे यांनी केले.