प्रभाग क्रमांक २ मध्ये पेव्हिंग ब्लॉक बनवणे कामाचे भुमिपुजन ; धुळीची समस्या कायमची मिटणार
कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव शहरातील प्रभाग क्र. २ मध्ये आमदार आशुतोषदादा काळे यांच्या प्रयत्नांतून ५ लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या कलविंदर डडीयाल घर ते झावरे घरापर्यंत रस्त्याच्या साईडपट्टीस पेव्हिंग ब्लॉक बनवणे कामाचे भुमिपुजन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित राहिलो.
आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी विधानसभा सदस्यत्वाचा कार्यभार स्वीकारल्यापासून ते सतत कोपरगावला धुळमुक्त करण्यासाठी धडपडत आहेत.
या भागात पेव्हिंग ब्लॉक बसवल्यामुळे ह्या रस्त्यावरची धुळीची समस्या कायमची मिटणार आहे तसेच पायी चालणाऱ्यांचीही सोय होणार आहे. दिवसेंदिवस कोपरगाव शहराचे सौंदर्य वाढत आहे व आशुतोषदादांच्या नेतृत्वाखाली लवकरच आपल्या शहराची एक सुंदर शहर म्हणून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात दखल घेतली जाईल याचा मला ठाम विश्वास आहे. हे काम वेळेत व गुणवत्तेत व्हावे याकडे माझे लक्ष असणार आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल.
यावेळी माजी नगरसेवक कृष्णाजी आढाव, अनिरुद्ध काळे, सोमनाथजी आढाव, विशालजी निकम, आशुतोषजी देशमुख, बापूसाहेबजी वढणे, योगेशजी वाणी, आशिषजी राजपाल, संदीपजी सावतडकर, रुपेशजी वाकचौरे, संतोषजी शेजवळ, कलवींदरसिंग डडीयाल, सिद्धेशजी होले, राहुलजी हंसवाल आदी उपस्थित होते.