पुन्हा येऊन दाखवलं, देवेंद्र फडणवीस यांच्यावर आधारित विवेकभैय्या कोल्हे यांनी बनवलेले गीत झाले प्रसिद्ध
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्या गाण्याचे जोरदार लॉन्चिंग
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव –देवाभाऊन पुन्हा येऊन दाखवलं,विवेकभैय्या कोल्हे यांनी बनवलेल्या गाण्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जोरदार लॉन्चिंग करण्यात आले आहे.यावेळी मा.आ.स्नेहलताताई कोल्हे उपस्थित होत्या. विरोधाला संयमाने कृतीतून उत्तर देत दमदार विजय मिळवण्यात भाजपा महायुतीला यश आले आहे.त्याबद्दल शुभेच्छा म्हणून कोल्हे यांनी भेट दिलेले हे गीत लोकप्रिय ठरते आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत मी पुन्हा येईन या देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्याने त्यांना विरोधकांनी हिणवले होते.अनेक टीका टिप्पणी त्यांच्यावर करण्याचा प्रयत्न केला गेला होता.मात्र नुकत्याच विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला अभूतपूर्व यश प्राप्त झाले.यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या मार्गदर्शनाने केलेला करिश्मा व चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाची केलेली बांधणी महत्वाची ठरली.पुन्हा येईन हा केवळ शब्द नव्हता तर तो महाराष्ट्राला दिलेला विश्वास होता हे सिद्ध झाले.
https://www.instagram.com/reel/DDt1pgRPmIE/?igsh=MXR1OWF0bzkzZ2F3NQ==
राज्याच्या विकासात्मक प्रवासाची घोडदौड २०१४ ते १९ मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.त्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून जनतेसाठी आपली भूमिका प्रभावीपणे बजावली.सामाजिक जाणिवेला प्राधान्य देत त्यांनी केलेल्या कामाचा व मिळालेला ऐतिहासिक विजय विवेकभैय्या कोल्हे यांनी अनोख्या पद्धतीने स्मरणीय केला आहे .
फडणवीस आणि कोल्हे कुटुंब यांचे असणारे विश्वासाचे ऋणानुबंध नेहमीच विविध प्रसंगात जपले जातात.कोपरगाव मतदारसंघासह व्यापक प्रमाणात कोल्हे यांनी पक्षासाठी घेतलेले धोरण व कोल्हे यांच्यावर असणारा विश्वास भविष्यात देवाभाऊंचे कार्य लोकप्रिय करण्यासाठी या नवीन गीताने महत्वाचा ठरणार आहे.विकासाचे आणि व्यक्तिमत्वाचे पैलू या गीताने लयबध्द पद्धतीने मांडण्यात व शब्दबध्द करण्यात आले आहे.अतिशय छान गीत झाले अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
विजयशंख ज्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र तयार केले आहे व पिंपळाचे पान ज्यावर अतिशय सुबक कलाकृतीद्वारे फडणवीस यांचा चेहरा रेखाटला आहे अशी अनोखी भेट कोल्हे यांनी यावेळी फडणवीस यांना दिली आहे.