निलेश लंके यांना निळवंडे पाट पाणी आणि कृती समितीचा पाठिंबा
महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा – उत्तमराव घोरपडे
शिर्डी (प्रतिनिधी)–उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण व कालवे होऊ नये यासाठी प्रवरेचे पिता पुत्र यांनी कायम अडकाठी निर्माण केली. मात्र त्यावर मात करून आमदार बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण केले असून आगामी काळामध्ये वितरिका व इतर कामे पूर्ण होण्याकरता महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना आमचा जाहीर पाठिंबा असून नगर दक्षिण मधून निलेश लंके या सर्वसामान्य जनतेचे खरे प्रतिनिधी असणाऱ्या उमेदवारास निवडून द्या असे आवाहन निळवंडे पाट पाणी कृती समितीचे उपाध्यक्ष विठ्ठलराव घोरपडे यांनी केले आहे.
याबाबत आवाहन करताना उत्तमराव घोरपडे म्हणाले की, निळवंडे धरणाचा प्रकल्प अनेक वर्ष रखडला. मात्र हा प्रकल्प रखडवण्यामध्ये प्रवरेचे पिता-पुत्र पुढे होते. यासाठी आम्ही मोठा संघर्ष केला निळवंडे धरण आणि कालव्यांची कामे ही जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केली आहे .अनेक अडचणीवर मात करून त्यांनी कालव्यांची कामे पूर्ण केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये या कामाकरता मोठा निधी मिळवला.

कामे पूर्ण झालीच होती मात्र गद्दारी झाली आणि सरकार कोसळले नवीन आलेल्या सरकारने काहीच केले नाही फक्त उद्घाटन केले त्यांचे कोणतेही श्रेय नाही.
उलट कालवे होण्याकरता आम्ही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पाटपाणी कृती संघर्ष समिती स्थापन केली. त्यावेळी खडकेवाके येथे या संघर्षकरी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. गुन्हे दाखल करण्यात आले .त्यामुळे या दडपशाही विरुद्ध आवाज उठवण्याकरता सर्वसामान्य शेतकरी एकवटला असून दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातून सर्वसामान्यांच्या प्रती जिव्हाळा असलेले गोरगरिबांचे नेते निलेश लंके यांच्या पाठीशी शेतकऱ्यांनी उभे राहावे असे आवाहन करताना नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहनही उत्तमराव घोरपडे यांनी केले आहे .
निळवंडे पाट पाणी कृती समितीच्या वतीने निलेश लंके यांना जाहीर पाठिंबा त्यांनी व्यक्त केला आहे या पाठिंबामुळे उत्तर नगर व दक्षिण नगर मधील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मधून मोठा आनंद निर्माण झाला आहे..