आपला जिल्हा

नको पाणी पंचमी, साजरी करू कोरडी रंगपंचमी आकाश नागरे यांचे कोपरगावकराना आवाहन

संपादक मनिष जाधव 9823752964

नको पाणी पंचमी, साजरी करू कोरडी रंगपंचमी
आकाश नागरे यांचे कोपरगावकराना आवाहन

कोपरगाव प्रतिनिधी – आज कोपरगाव सह इतर जिल्ह्यांत , तालुक्यात परिसरात रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. यावर्षी असणारी पाणीटंचाई परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा अपव्यय करू नये. शक्यतो कोरड्या व नैसर्गिक रंगांचा वापर करून रंगोत्सव साजरा करावा, असे आवाहन कोपरगाव तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी केले आहे.

आकाश

दरवर्षी शहरासह तालुक्यात रंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रंग खेळताना पाण्याचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अनेक ठिकाणी सार्वजनिकरित्या रंगपंचमी साजरी केली जाते. अशा पद्धतीने रंगपंचमी साजरी करताना पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेक ठिकाणी पाण्याचे टँकरच उभे केले जातात.

ऊ
जाहिरात

पाऊस कमी झाल्यामुळे भुगर्भातील पाणीपातळी वाढली नाही. परिणामी शहरातील विंधन विहीरींनाही मर्यादित पाणी उपलब्ध आहे. अनेक विंधन विहीरी बंद पडत आहेत. गरजेपेक्षा अधिक वापर किंवा पाण्याचा अपव्यय झाला तर भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी रंग खेळताना पाण्याचा वापर करू नये. अनावश्यक पाणी वापरू नये. रंगात पाणी मिसळण्याऐवजी कोरडे व नैसर्गिक रंग वापरावेत, असे आवाहन कोपरगाव तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी केले आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!