Uncategorized

…तर यांनाच भाजपात घेतल्यास संपुर्ण अ.नगर जिल्हा भाजपामय होण्यास वेळ लागणार नाही – विजयराव वहाडणे

संपादक मनिष जाधव 9823752964

…तर यांनाच भाजपात घेतल्यास संपुर्ण अ.नगर जिल्हा भाजपामय होण्यास वेळ लागणार नाही – विजयराव वहाडणे

विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत.अ.नगर जिल्ह्यातील विधानसभेच्या बहुतांश जागा पदरात पाडून घ्यायच्या असतील तर लवकरात लवकर श्री.बाळासाहेब थोरात,शंकरराव गडाख,संग्राम जगताप,निलेश लंके यांना भाजपात घेण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.या निर्णयाचे भाजपातील सर्व शिस्तबद्ध निष्ठावान कार्यकर्ते स्वागतच करतील यात शंकाच नाही.

वहाडणे
खेड्यापाड्यातील कार्यकर्त्यांनाही आता भाजपाचा झेंडा घेऊन प्रचार करण्याची तसदी घेण्यापेक्षा असा निर्णय नक्कीच मान्य होईल. आता तर लवकरच होऊ घातलेल्या गणेश स. साखर कारखाना निवडणुकीसाठी भाजपाच्या माजी आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे व काँग्रेसचे आ.बाळासाहेब थोरात ना.राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात एकत्र आलेलेच आहेत.म्हणून भाजपाच्या नेत्यांनी आपापसात वाद- कटुता वाढविण्यापेक्षा आ.बाळासाहेब   थोरात यांनाच भाजपात घेतल्यास संपुर्ण अ.नगर जिल्हा भाजपामय होण्यास वेळ लागणार नाही. असा निर्णय घेतल्यास जिल्ह्यातील बहुतांश सहकारी संस्थाही भाजपाचे वर्चस्वाखाली येतील. त्यामुळे भाजपाची पाळेमुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावात-वड्या वस्त्यांवर खोलवर रुजतील यात शंकाच नाही.भाजपाचे सर्वच कार्यकर्ते अशा निर्णयाचे आनंदाने स्वागतच करतील. आपल्या जिल्ह्यातील स्व.सूर्यभानजी वहाडणे, स्व.आण्णासाहेब कदम, स्व.माणिकराव पाटील, स्व.अण्णासाहेब बागुल, स्व.राजाभाऊ झरकर, डॉ.ल.का.देशपांडे, स्व.शंकरलालजी जाजू स्व.कृष्णराव बडदे इ.असंख्य जेष्ठांना व स्वयंसेवकांनाही जे जमले नाही ते आपण अशा निर्णयातून झटपट साध्य करू शकतो असे मला वाटते.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!