डॉ. सिद्धार्थ शिंदे यांना 2022-23 चा इंडिया ब्रँड आयकॉन अवॉर्ड
संगमनेर ( प्रतिनिधी) अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांचे सुपुत्र डॉ. सिद्धार्थ शिंदे यांनी ऑर्थोडोंटिक्स दंतरोग चिकित्सा विभागात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना ऑस्ट्रेलियाचा तेज गोलंदाज ब्रेट ली यांच्या हस्ते इंडिया ब्रँड आयकॉन अवॉर्ड 2022-23 मिळाला आहे.
डॉ. सिद्धार्थ अनिल शिंदे हे मागील अकरा वर्षापासून पुणे येथे दंत सर्जन व विशेष सेवा म्हणून कार्यरत आहेत. ऑर्थोडोंटिस्ट म्हणून काम करताना त्यांनी केलेल्या विविध व वेड्या वाकड्या दातांच्या समस्या (smile designing) या क्षेत्रात संशोधन वर केलेले काम, लिहिलेले पुस्तक आणि सर्वसामान्य सेवा देण्याची पद्धती, याचबरोबर समाजकार्यात घेतलेल्या सहभाग या सर्व कामांमुळे त्यांचा एक्सलन्स इन क्लिनिकल ऑर्थोडोंटिक्स पुणे या मानाच्या पुरस्कारात विभागात टाइम्स सायबर मेडिया ग्रुपने इंडिया ब्रँड आयकॉन अवॉर्ड 2022-23 देऊन सन्मान केला आहे.

डॉ. सिद्धार्थ शिंदे हे अनिल शिंदे यांचे सुपुत्र असून शेतकरी कुटुंबातून आलेल्या डॉ. सिद्धार्थ शिंदे यांनी पुणे येथील कर्नाटक हायस्कूल येथून शालेय शिक्षण घेतले तर एस एम बी टी दंत महाविद्यालय येथून बीडीएस हे पदवीचे व भारती विद्यापीठ मधून एमडीएस सर्जन (ऑर्थोडोंटिक्स) हे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. गुणवत्ता व नाविन्यपूर्ण काम करण्याची पद्धत यामुळे त्यांनी अल्पावधीतच पुणे सारख्या मेट्रो शहरात आपला नावलौकिक मिळवला आहे
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा.आ डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, सौ शरयुताई देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, चार्टर्ड अकाउंटंट डॉ. शिवाजीराव झावरे ,अमृतवहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, सौ स्वागत शिंदे, धवल शिंदे आदींसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
