Uncategorized

ज्योती पतसंस्थेचे सहकार व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान – संदीप कोळी

संपादक मनिष जाधव 9823752964

अ

ज्योती पतसंस्थेचे सहकार व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान – संदीप कोळी 

कोपरगांव प्रतिनिधी मनिष जाधव – सहकारी पतसंस्था चळवळीत काम करताना ज्योती सहकारी पतसंस्थेचा विकासाचा आलेख उंचावत गेला. सर्वसामान्य जनतेला आर्थिक पाठबळ देण्याचे काम पतसंस्थेचे अध्यक्ष अॕड रविंद्र बोरावके व त्यांच्या सहकार्‍यांनी मोठ्या प्रमाणात केले असल्याचे गौरवोद्गार कोपरगांव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी व्यक्त केले आहे.
ई
राज्यात नावलौकिक असलेली ज्योती सहकारी पतसंस्थेची “दिनदर्शिका२०२५” चे प्रकाशन सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ, यांच्या शुभहस्ते झाले तर यु.पी.आय. क्यु.आर. कोड चे उद्घाटन कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी श्री. संदीप कोळी बोलत होते. यावेळी सहकार खात्याचे अधिकारी राजेंद्र राहणे, एल.आय.सी चे विकास अधिकारी दिपक काळे उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे संस्थेचे चेअरमन अॕड रविंद्र बोरावके यांनी सत्कार करून स्वागत केले. यावेळी उपस्थित खातेदारांना मान्यवरांच्या हस्ते यु.पी.आय. क्यु.आर. कोड चे वाटप करण्यात आले.
औ
ज्योती पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देवुन संदीप कोळी पुढे बोलतांना म्हणाले की, ज्योती पतसंस्थेने अल्पावधीत दैनंदिन व्यवहार, ठेवी, कर्ज पुरवठा यामध्ये नियोजनबध्द कार्य केल्यामुळे ही संस्था अनेक पतसंस्थांसमोर एक आदर्श निर्माण करत असुन पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. पतसंस्थेने कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत विविध कामांवर भर दिला असल्याचे शेवटी श्री. संदीप कोळी म्हणाले.

औ

यावेळी एल.आय.सी चे विकास अधिकारी दिपक काळे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, केंद्र सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबानासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी विमा सखी योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळू शकणार आहे. तसंच महिन्याला ७ हजार रुपये हे मानधन स्वरूपात मिळू शकतात अशी ही योजना असुन महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन दिपक काळे यावेळी केले. 
ए
संस्था ऑनलाइन व्यवहार करीत आहे. डिडी काढणे, आरटीजीएस, एनईएफटी च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करणे, लाॕकर्स , सोनेतारण कर्ज, एस.एम.एस.सुविधा, मोबाईल बँकिग, कोअर बँकिंग, ई चलन सुविधा, सुलभ कर्ज वितरण सुविधा, ज्योती मोबाईल बँकिंग सुविधा, ज्योती मोबाईल कलेक्शन सुविधा,आदि विविध सुविधांसह शेतकरी बांधवांसाठी त्वरीत कमीतकमी व्याजदराने सोने तारण कर्ज उपलब्ध असुन पतसंस्थेची आर्थिक स्थिती पुढीलप्रमाणे ठेवी – ३४५ कोटी, कर्ज – २२९ कोटी, गुंतवणूक १४१ कोटी, स्वनिधी २५ कोटी, नफा २ कोटी ६६ लाख नेट एन.पी.ए. शुन्य टक्के असुन संस्थेचा सतत आॕडीट वर्ग “अ” आहे. सदर पतसंस्थेचे कोपरगाव, शिर्डी, सुरे गाव, कोल्हार, राहुरी, श्रीरामपूर, येवला , अहमदनगर या ठिकाणी ज्योती पतसंस्थेचे शाखा आहेत.
औऐ
यावेळी अॅड.श्री. रविंद्र रामदास बोरावके (चेअरमन), कारभारी पांडुरंग जुधारे (व्हा.चेअरमन) , सर्व संचालक प्रभाकर माधवराव पाटील,  मच्छिद्र कारभारी पठाडे, वाल्मिक गेणदेव भास्कर, महेंद्र माधवराव नवले, देवराम रामचंद्र सजन, राजेंद्र हरिभाऊ बोरावके, दिपक श्रीधर गायकवाड, रविंद्र ज्ञानदेव राऊत, यशवंत रामचंद्र आबनावे, वैशाली मनोज गिरमे, शितल अमित आहेर, किरण तुकाराम बोरावके, विनोद माधवराव रांधवणे,  सुरेश भागवत शिंदे व्यवस्थापक, सह. व्यवस्थापक सुनिल अशोक क्षिरसागर यांच्यासह शाखांचे व्यवस्थापक, कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे आभार मच्छिंद्र पठाडे यांनी केले.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!