जुना प्रभाग क्रमांक २ मधील नवीन पाईप लाईनच्या कामाला सुरुवात
आमदार आशुतोषदादा काळे व प्रशासनाचे नागरिकांनी मानले आभार
कोपरगांव – कोपरगाव शहरातील जुना प्रभाग क्र. २ मध्ये गजानन अपार्टमेंट भागात पिण्याची पाईपलाईन जीर्ण झाल्यामुळे त्यातून गाळमिश्रित पाणी येत होते. परिसरातील नागरिकांनी याबद्दल आमदार आशुतोषदादा काळे यांच्याकडे या भागात नवीन पाईपलाईन टाकून मिळावी अशी मागणी केली होती. सदर मागणीची तात्काळ दखल घेऊन आमदार आशुतोषदादा काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेला त्वरित आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदर सूचनेनुसार नगरपरिषदेकडून आजपासून या भागात नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली असल्याची माहिती प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते डाॕ. अनिरुध्द काळे यांनी दिली.
नागरिकांनी नवीन पाईपलाईन टाकण्याची केलेली मागणी गांभीर्याने घेऊन नगरपरिषदेला सूचना दिल्याबद्दल आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांचे तसेच कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. शांतारामजी गोसावी साहेब, पाणीपुरवठा अधिकारी पाटील मॅडम यांचे जुना प्रभाग क्र. २ मधील नागरिकांच्या वतीने मनःपूर्वक आभार.