एक राखी सैनिकांसाठी रक्षाबंधन सणानिमित्त टाकाऊ पासून टिकाऊ या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी राख्या बनविलेल्या
कोपरगाव प्रतिनिधी – 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान हर घर तिरंगा हा उपक्रम स्वातंत्र्य दिनाच्या राष्ट्रीय सणानिमित्त संपूर्ण भारतात उत्साहाने साजरा होत आहे.
या उपक्रमात सर्व शासकीय नियम शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालये सहभागी आहेत. एक राखी जवानाकरिता ही थीम घेऊन कोपरगाव नगरपालिका शाळा नंबर पाच बेट येथील विद्यार्थ्यांनी विविध रंगीबेरंगी कागद, मनी, कापडी, प्लास्टिकच्या,पट्ट्या रेखीव- सुबक अशा राख्या स्वतः तयार केल्या. या कामी त्यांना मार्गदर्शन व सुलभक म्हणून शाळेच्या शिक्षिका नसरीन इनामदार पठाण यांनी काम पाहिले. त्यासाठी त्यांनी बरेच साहित्यही पुरविले. विद्यार्थ्यांनी आपापसात स्पर्धा लावून छान राखी बनविण्याचा प्रयत्न केला. रक्षाबंधन हा सण आता उत्साहाने साजरा होणार आहे. परंतु आपल्या देशाचे रक्षण करणारे व घरापासून दूर राहणारे आपले सैनिक बांधव अशा रक्षाबंधनापासून वंचित राहू नये म्हणून शाळेने या राख्या त्यांना पाठविण्याचे ठरविले. त्याप्रमाणे पोस्टाने सर्व राख्या अहमदनगर येथील मिलिटरी कॅम्प ला पाठविण्यात आल्या.
हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शाळेचा माजी विद्यार्थी हा जो मिलिटरी मध्ये भरती झालेला आहे अनिकेत बाळासाहेब गीते व त्याचा सर्व परिवार यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी त्याने विद्यार्थ्यांना आपले अनुभव विशद केले.तसेच शाळेत स्वातंत्र्य दिनाच्या विषयावर चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली. यात शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. हर घर तिरंगा या उपक्रमाकरिता शाळेचे मुख्याध्यापक विलास माळी शिक्षक सुनील रहाणे, नसरीन इनामदार व अमोल कडू यांनी विशेष परिश्रम घेतले. हर घर तिरंगा या राष्ट्रीय कार्यक्रमाकरिता कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप व नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी श्रीराम थोरात यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल.
संपादक - मनिष एस. जाधव 9823752964