हजारो साईभक्तांसह व रेन्बो स्कुलच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साई परिक्रमा सोहळा उत्साहात साजरा
कोपरगांव मनिष जाधव – साईबाबानंप्रति भाविकांची अढळ श्रद्धा असून गेल्या वर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत साई परिक्रमा सोहळा साजरा झाला होता, त्याचप्रमाणे यंदाचा सोहळा साई परिक्रमा महोत्सव २०२३ देशविदेशातील भाविकांच्या साक्षीने साजरा झाला असुन यात वारकरी व विठ्ठलाच्या रुपात असलेले कोपरगांव येथील रेन्बो इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थी साईबाबांचा जयघोष करत सहभागी होते.
या महोत्सवाची तयारी ग्रीन एन क्लीन फाउंडेशन, शिर्डी ग्रामस्थ, शिर्डी नगरपरिषद, पोलीस प्रशासन , साईभक्त यांच्यासह रेन्बो स्कुलचे विश्वस्त आकाश नागरे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.परिक्रमा मार्गावर रांगोळ्या काढून भविकांचे स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी चहा-नाश्ताची सोय करण्यात आली होती. महामार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तेथील जड वाहतूक बाह्यवळण मार्गाने वळवण्यात आली होती. साईनामाचा गजर आणि घोषणा देत साईभक्तांनी तब्बल १४ किलोमीटरची ही परिक्रमा पूर्ण केली. त्यासोबतच मार्गावर स्वच्छता मोहीमही राबवण्यात आली.
सिद्धी गोंदकर – संत मुक्ताबाई, सई सूर्यवंशी – संत जनाबाई, यादव साई भावनी – संत मीराबाई, दत्ता डोखे सर – संत नामदेव, साई गुंड – संत गोरा कुंभार, सुमित ठुबे – सावता माळी, हर्ष कोठारी – संत तुकाराम, देव वेद – व्यास महर्षी, श्रीराज शिंदे – संत ज्ञानेश्वर, अवधूत देवकर – चांगदेव महाराज, रियांशी वाळुंज – रखुमाई या बालकांनी आयोजित केलेल्या परिक्रमेत शिर्डी माझे पंढरपुर या वेशभुषेत रेन्बो इंटनॕशनल स्कुलचे विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी रेन्बो स्कुलचे विश्वस्त आकाश नागरे, उपप्राचार्य प्रशांत भास्कर सर यांच्यासह स्कुलचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.