आपला जिल्हा

‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत सुरक्षित आदरातिथ्यासाठी ओवायओ ने नागपूर पोलिसांशी हातमिळवणी केली

मनिष जाधव 9823752964

ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत सुरक्षित आदरातिथ्यासाठी ओवायओ ने नागपूर पोलिसांशी हातमिळवणी केली

परेशन शक्ती अंतर्गत, नागपुरातील हॉटेल्समध्ये सुरक्षित आदरातिथ्य वाढवण्यासाठी आणि अनैतिक
कृत्यांना आळा घालण्यासाठी, नागपूर पोलीस आणि ओवायओ (OYO) यांनी हातमिळवणी केली आहे.
या उपक्रमांतर्गत, ओवायओ त्यांच्या संलग्न हॉटेल्समध्ये पोलिसांनी दिलेल्या सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करेल.

R

* या योजनेचा भाग म्हणून, ओवायओ चे नाव बेकायदेशीरपणे वापरणाऱ्या हॉटेल्सवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाईल.
* या परिसंवादात नागपूर आणि परिसरातील ५० हून अधिक ओवायओ हॉटेल मालक तसेच वरिष्ठ पोलीस
अधिकारी सहभागी झाले.

*नागपूर, ऑगस्ट २०२५ –* जागतिक हॉस्पिटॅलिटी तंत्रज्ञान कंपनी ओवायओ ने नागपूर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’ या उपक्रमाला पाठिंबा जाहीर केला आहे. ‘ *ऑपरेशन शक्ती’* *चा उद्देश मानवी तस्करीला प्रतिबंध करणे आणि शहरातील हॉटेल्सना इतर बेकायदेशीर कृत्यांपासून सुरक्षित ठेवणे हा आहे* . नागपूरमधील हॉटेल्समधील अनैतिक कृत्यांविरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी, संबंधितांना शिक्षित करण्यासाठी आणि एकत्रितपणे कार्य करण्यासाठी, ओवायओ ने पोलिसांच्या सहकार्याने सुरक्षित आदरातिथ्यावर आधारित एक परिसंवाद आयोजित केला. या कार्यक्रमात *५० हून* अधिक ओवायओ हॉटेल मालक आणि शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी झाले. ओवायओ ने स्पष्ट केले की, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध हॉटेल्ससाठी आधीपासूनच एक मजबूत सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे ही हॉटेल्स स्थानिक कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांनी दिलेल्या सर्व सुरक्षा नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतात. यामध्ये पाहुण्यांची अनिवार्य पडताळणी, कर्मचाऱ्यांचे नियमित प्रशिक्षण, वाढीव पाळत ठेवणे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची त्वरित पोलिसांना माहिती देणे यांचा समावेश आहे. तसेच, ओवायओ त्यांच्या हॉटेल भागीदार आणि कर्मचाऱ्यांना पाहुण्यांचे वर्तन किंवा संशयास्पद चेक-इन ओळखण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी नियमित सुरक्षाविषयक प्रशिक्षण देते.” *ऑपरेशन शक्ती* “अंतर्गत पोलिसांनी दिलेल्या इतर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन नागपूरमधील *OYO* चे सर्व भागीदार *हॉटेल्स करतील, असेही ओवायओ ने आश्वासन दिले आहे. यामध्ये हॉटेल परिसरात “* अनैतिक व बेकायदेशीर कृत्यांना शून्य सहनशीलता *” (Zero Tolerance)* असल्याचे फलक ठळकपणे लावणे याचाही समावेश आहे.
या उपक्रमाबद्दल बोलताना, अमोल देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व नागपूरमधील झोन १ चे ‘ऑपरेशन शक्ती’ प्रभारी म्हणाले, “'ऑपरेशन शक्ती' हे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. ओवायओ सारख्या भागीदारांचे सहकार्य या उपक्रमाच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.”
नागपूरमधील या भागीदारीच्या माध्यमातून, ओवायओ शहरात आणि शहराबाहेर सुरक्षित, जबाबदार व समाजकेंद्री
आदरातिथ्य प्रणाली उभारण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत आहे.
*गगनदीप गुप्ता, उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रमुख, ओवायओ म्हणाले,* “बनावट ओवायओ हॉटेल्स ही एक गंभीर समस्या आहे. आम्ही पोलिसांना विनंती करतो की ओवायओ चे नाव बेकायदेशीरपणे वापरणाऱ्या हॉटेल्सवर कठोर कारवाई करावी. आम्ही पोलिसांसोबत एक पारदर्शक यंत्रणा तयार करत आहोत, जिथे माहितीची देवाणघेवाण नियमित होईल आणि कारवाई त्वरित होईल, *जेणेकरून नागपूर पाहुण्यांसाठी सुरक्षित शहर बनेल.* ” हा उपक्रम देशभरात सुरक्षित व जबाबदार आदरातिथ्य सुनिश्चित करण्याच्या ओवायओ च्या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा भाग आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, *ओवायओ ने नोएडा, चंदीगड, लखनऊ, बंगळूरू, पुणे आणि कोलकाता यांसारख्या शहरांमध्येही असेच परिसंवाद आयोजित केले असून, स्थानिक पोलीस दलांशी सहकार्य अधिक दृढ केले आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!