विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून पूरक व्यायाम करून निरोगी आरोग्य ठेवणे गरजेचे आहे: मकरंद कोऱ्हाळकर सर
कोपरगाव तालुक्यातील नामवंत इंग्लिश मीडियम असणाऱ्या संजीवनी इंग्लिश मीडियम शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सवाची(2024/25) दि.21 डिसेंबर रोजी शानदार उद्घाटन सोहळ्याने सुरुवात झाली
सदर कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी, महाराष्ट्रातील नामवंत क्रीडा मार्गदर्शक, माझी मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर सर हे होते. यावेळी संस्थेच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ. रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे, शाळेचे प्रिन्सिपल मोहसीन शेख उपस्थित होते.
दीप प्रज्वलन क्रीडा ज्योत प्रज्वलित करून सदर स्पर्धेचे उद्घाटन झाले.. यावेळी बोलताना मुख्य अतिथी को ऱ्हाळकर सर यांनी माजी मंत्री, सहकार महर्षी दिवंगत शंकरराव कोल्हे साहेब यांच्या दूरदृष्टी चे भरभरून कौतुक केले.

कोल्हे कुटुंब आदरणीय साहेब यांच्या नंतरही आज सुध्दा आदरणीय बिपीन दादा कोल्हे, प्रथम महिला आमदार आदरणीय सौ. स्नेहलता ताई,महाराष्टातील सर्वांना हवे असणारे नेतृत्व विवेक भैय्या साहेब, संस्थेच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ. रेणुका ताई कोल्हे या सर्वांचा विशेष उल्लेख केला..
आपल्या मुख्य भाषणात संस्थेच्या मॅनेजिंग ट्रस्टी रेणुका ताई कोल्हे यांनी शाळेचे प्राचार्य व सर्व शिक्षक मेहनत घेत असून त्यामुळे शाळा सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असल्याचे प्रकर्षाने सांगितले. या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवात व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, मैदानी खेळ, कबड्डी खो-खो या खेळांच्या विविध स्पर्धा होणार आहेत यासाठी शाळेतील केजी पासून दहावीपर्यंत सर्व विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थिनी कुमारी वेदश्री दरेकर व कुमारी संस्कृती शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे प्राचार्य मोहसीन शेख यांनी मानले. शाळेची क्रीडा मार्गदर्शक अनुप गिरमे या सर्व स्पर्धेचे नियोजन करीत असून त्यांना शाळेतील सर्व शिक्षक ,शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहकार्य करीत आहेत.