एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुलचा विद्यार्थी सार्थक नवनाथ थोरात तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम
अंदरसुल सचिन सोनवणे – मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल, अंदरसुल इ.१०वी चा विद्यार्थी सार्थक थोरात याने दि.१६ ऑगस्ट २०२४ रोजी साई सिद्धी पोतदार स्कूल पारेगाव येथे झालेल्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आयोजित १७ वय वर्ष अंतर्गत “तालुकास्तरीय बुद्धीबळ” स्पर्धेत “येवला तालुक्यात प्रथम” क्रमांकाने यश संपादन करून आपल्या एम.एस.जी.एस. ची धवल यशाची परंपरा राखली. तसेच पुढील होणाऱ्या “जिल्हास्तरीय बुद्धीबळ” स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.सार्थक थोरात यास क्रीडा शिक्षक साक्षी देशमुख व राजेश कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.येवला तालुका क्रीडा संयोजक नवनाथ उंडे, बुद्धीबळ स्पर्धा आयोजक किरण कुलकर्णी, गणेश मोरे, स्पर्धा परीक्षक सागर लोणारी, स्पर्धा पंच श्रीकांत वाकचौरे, इ. सह सर्वांनी स्पर्धा यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य केले
सार्थक थोरातच्या या यशाबद्दल अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, सहचिटणीस मयूर सोनवणे, संचालक तथा कार्यकारी अधिकारी राजेंद्र गायकवाड, संचालक डॉ. भगिनाथ जाधव, जीवन गाडे, उज्ज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे, जनार्दन जानराव, आकाश सोनवणे, संगीताताई सोनवणे, मा.सरपंच तथा विद्यमान सदस्या विनिता अमोल सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, प्राचार्या डॉ.सूवर्णा कडलग, शिक्षक अमोल आहेर, दीपक खैरनार, गणेश सोनवणे, अजीम पटेल, पारस भगत, सचिन घोडके, माधुरी माळी, नीलिमा देशमुख, अर्चना एंडाईत, सुनीता वडे सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.