ज्योती सहकारी पतसंस्थेस सन 2023 चा बँको ‘ब्लू रिबन’ पुरस्कार जाहिर
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – अविज पब्लिकेशन कोल्हापुर यांचेतर्फे दिला जाणारा व सहकार क्षेत्रात महत्वाचा समजला जाणारा राज्यस्तरीय सन 2023 चा बँको ‘ब्लू रिबन’ हा पुरस्कार नागरी सहकारी पतसंस्था विभागात 250 कोटी ते 300 कोटी पर्यंत ठेवी असलेल्या गटात नुकताच ज्योती पतसंस्थेस जाहिर झाला आहे. अशी माहिती संस्थेचे विद्यमान चेअरमन अॅड.श्री. रविकाका बोरावके यांनी दिली.

आर्थिक वर्षे सन 2022-23 साठी अविज पब्लिकेशन कोल्हापुर यांनी सादर केलेल्या प्रश्नावलीच्या आधारे तज्ञ समितीने केलेल्या मूल्यांकना नुसार ज्योती पतसंस्थेची निवड करण्यात आलेली आहे. सहकार क्षेत्रात भरीव व आर्थिक बळकटी मिळावी या उद्देशाने अविज पब्लिकेशन कोल्हापुर व गॅलेक्सी इन्मा पुणे यांचे संयुक्त विद्यमाने गेली दहा वर्षे पुरस्कार समारंभ आयोजित करीत आहे.
सदर पुरस्कार सोहळा ता. 14 फेब्रुवारी 2024 रोजी डेल्टीन रिसॉर्ट, दमन येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या सोहळ्यात संस्थेस पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ज्योती पतसंस्थेस यापूर्वीही सलग 9 वर्षे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. संस्थेस पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन अॅड. श्री. रविकाका बोरावके व संचालक मंडळ यांनी सर्व सभासद, खातेदार, हितचिंतक व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.