Uncategorized

कोपरगाव मतदार संघाचा नियोजनबद्ध विकास रस्ते व सी.डी. वर्क कामासाठी दीड कोटी निधी मंजूर – आ.आशुतोष काळे

मनिष जाधव 9823752964

कोपरगाव मतदार संघाचा नियोजनबद्ध विकास रस्ते व सी.डी. वर्क कामासाठी दीड कोटी निधी मंजूर – आ.आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी निधी मिळविण्याची आ. आशुतोष काळे यांची घौडदौड सुरूच आहे. मतदार संघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केलेल्या नियोजित आराखड्या नुसार मतदार संघाचा नियोजनबद्ध विकास सुरु आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी रस्त्यांच्या दुरुस्तीबरोबरच सी.डी.वर्कची आवश्यकता आहे त्या ठिकाणी निधी मिळावा यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाची महायुती शासनाने दखल घेवून मतदार संघातील बहादाराबाद, हंडेवाडी व सुरेगाव या गावातील रस्ते व सी.डी. वर्क कामासाठी दीड कोटी जिल्हा वार्षिक नियोजन लेखाशीर्ष ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण ३०५४ अंतर्गत मंजूर केला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

चआआ

महायुती शासनाकडून मतदार संघाच्या विकासासाठी निधी मिळवून मतदार संघाच्या विकासाचे प्रश्न कायमचे मार्गी लावण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने मतदार संघाच्या विकासाचा आराखडा तयार करून त्याबाबतचे अनेक प्रस्ताव शासन दरबारी दाखल केले आहेत. या प्रस्तावांना मंजुरी मिळविण्यासाठी वेळोवेळी सबंधित मंत्रालयाकडे अविरतपणे पाठपुरावा सुरु असून याच पाठपुराव्यातून मतदार संघातील तीन गावातील रस्ते व सी.डी. वर्क साठी दीड कोटी निधी देण्यास महायुती शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे.

यामध्ये बहादराबाद जालिंदर कोल्हे वस्ती ते औताडे घर रस्ता (ग्रा.मा. ५२) डांबरीकरण करणे (६० लक्ष), भास्करराव तीरसे वस्ती ते हडेवाडी गाव रस्ता ग्रा.मा. २५ डांबरीकरण करणे (६५ लक्ष) व सुरेगाव गावठाण जवळ सि.डी. वर्क करणे ग्रा.मा. २८ (२५ लक्ष) असा एकूण दीड कोटी निधी मंजूर केला आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार असल्यामुळे मागील अनेक वर्षापासूनची अडचण दूर करणाऱ्या आ.आशुतोष काळे यांचे नागरिकांनी आभार मानले आहे. शासनाकडे दाखल केलेल्या प्रस्तावाची दखल घेवून महायुती शासनाने दीड कोटी निधी मंजूर केल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मतदार संघातील जनतेच्या वतीने आभार मानले आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!