रेनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा
मनिष जाधव कोपरगांव प्रतिनिधी – कोपरगांव येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा झाला. संस्थेचे कार्यकारी विश्वस्त श्री. आकाश नागरे तसेचू कोपरगाव लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष श्री राम जी थोरे यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. या प्रसंगी कुसुमाग्रजांच्या पावन स्मृतीला अभिवादन म्हणून शालेय विद्यार्थ्यांची भाषणे, नाट्य आणि मराठी सांस्कृतीक कार्यक्रमाचे सुंदर प्रदर्शन केले.
नटसम्राट, ती फुलराणी, मराठी विश्वकोष, मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि अस्मीता यांचे सुंदर प्रदर्षन करण्यात आले. राम थोरे यांनी मराठी भाषा, आणि संस्कृती यांचे सुंदर विवेचन आपल्या मनोगतातून व्यक्त केले. सदर मराठी दिनाच्या या कार्यक्रमाने मी भारावून गेलो आहे असे गौरवोदगार श्री. राम थोरे यांनी व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांचा परीचय प्रसाद भास्कर यांनी केला व श्री आकाश नागरे यांनी त्यांचा सत्कार केला.
मराठी दिनाच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थेचे विश्वस्त संजय नागरे, मनोज अग्रवाल, आनंदजी दगडे, वनिताताई नागरे यांनी समाधान व्यक्त करून सर्व विद्यार्थी व शिक्षकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या, उपप्राचार्य प्रशांत भास्कर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले.