आपला जिल्हा

सामाजिक कार्यकर्ते भिवा बिडगर यांना  विशेष गौरव पुरस्कार जाहिर 

संपादक मनिष जाधव 9823752964

सामाजिक कार्यकर्ते भिवा बिडगर यांना  विशेष गौरव पुरस्कार जाहिर 
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील दाऊतपूर येथील सामाजिक क्षेत्रात सक्रीय काम करणारे (वाहून घेतलेले) सामाजिक कार्यकर्ते भिवा बिडगर यांना मराठवाडा साथीच्या वर्धापनदिनानिमित्त दिला जाणारा “विशेष गौरव” पुरस्कार जाहीर झाला. समितीचे आयोजक मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांनी या पुरस्काराची नुकतीच घोषणा केली आहे.  त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून मान्यवर, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून स्वागत व अभिनंदन होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते भिवा बिडगर
पुरस्काराकरीता निवड झाल्याचे पुरस्कार निवड समितीने त्यांना एका पत्राद्वारे कळविले आहे. सविस्तर वृत्त असे की, सामाजिक कार्य करीत असताना कोणताही व्यक्ती राजकीय ध्येय समोर ठेवूनच सामाजिक कार्यात उतरत असतो . मात्र, काही व्यक्तिमत्व समाजामध्ये असे आहेत की, सामाजिक कार्यात कोणताही वैयक्तिक हेतू समोर न ठेवता सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत, त्यामधील एक नाव सांगता येईल ते म्हणजे परळी तालुक्यातील दाऊतपूर येथील भूमिपुत्र भिवा ज्ञानोबा बीडगर होय. सामाजिक कार्यकर्ते भिवा ज्ञानोबा बीडगर यांनी सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करुन कामगिरी केली आहे. सामाजीक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल मराठवाडा साथीच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त यावर्षीचा सन 2023 साठीचा “विशेष गौरव”  पुरस्कार त्यांना नुकताच जाहीर झाला. वैद्यनाथ औद्योगिक वसाहत  सभागृह, परळी वैजनाथ येथे गुरुवार,दि.23 फेब्रुवारी 2023 रोजी सायं. 5 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटक व पुरस्काराचे वितरण आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून आनंदग्रम प्रकल्पचे संस्थापक दत्ताभाऊ बारगजे व संचलिका सौ. संध्याताई बारगजे तर चंदुलाल बियाणी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. सदरील पुरस्काराचे विशेष समारंभात वितरण करण्यात येणार आहे. स्मृतीचिन्ह, सन्मान पत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
दरम्यान सामाजिक कार्यकर्ते भिवा बिडगर बोलतांना म्हणाले की,  मिळालेला पुरस्कार माझी सामाजीक जबाबदारी वाढवीत आहे तसेच ते माझा उत्साह वाढवीत मला सकारात्मक ऊर्जा देत माझी प्रेरणा वाढवीत असल्याचे  मत व्यक्त केले. परळी वैद्यनाथाच्या भूमीत मला काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे या मातीचा ऋनी राहत पुढील आयुष्य आईवडिलांनी दिलेल्या विचारांचा वारसा जपत समाजासाठीच अर्पीत करू असे उदगार काढले. या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सामाजिक कर्यकर्ते भिवा बिडगर यांचे सामाजिक, धार्मिक, पत्रकारिता, शैक्षणीक, क्षेञातील मान्यवर, मित्र परिवार व नातेवाईकांकडून स्वागत व अभिनंदन होत आहे.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!