70 वर्षीय आजींवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये मोफत बायपास शस्त्रक्रिया-: हृदयरोग तज्ञ -:डॉ प्रणव माळी
संभाजीनगर जिल्ह्यातील 70 वर्षीय नजमा अब्बास पटेल यांच्यावर यशस्वी बायपास शस्त्रक्रिया आत्मा मालिक हॉस्पिटल कोकमठाण येथे करण्यात आली नजमा यांना आत्तापर्यंत तीन हार्ट अटॅक आले होते त्यानंतर त्यांना संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले व त्यांच्यावर उपचार करत अँजिओग्राफी करण्यात आली.
त्यामध्ये त्यांच्या हृदयाच्या मुख्य रक्तवाहिन्यांमध्ये तीन ब्लॉकेज असल्याचे समजले व त्यांना बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला परंतु त्यांचे वय 70 वर्ष असल्याने व अगोदर त्यांना तीन हार्ट अटॅक येऊन गेल्याने शस्त्रक्रिया ही जोखमीची असल्याने व कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसल्याने एवढा खर्च परवडणारा नव्हता कोपरगाव येथील नातेवाईकांनी डॉक्टर प्रणव माळी आत्मा मालिक हॉस्पिटल कोकमठाण महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत बायपास शस्त्रक्रिया करत असल्याचे सांगितले व पेशंटला आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले त्यांच्या सर्व आवश्यक चाचण्या केल्यानंतर त्यांना डॉक्टर प्रणव माळी यांनी बायपासचा सल्ला दिला व नातेवाईक यांना आधार दिला व जोखमीची बायपास शस्त्रक्रिया करणार आहे असे सांगितले अगोदरच्या उपचारामुळे त्यांच्या खूप आर्थिक खर्च झाला होता व त्यातून ते पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या खचले होते त्यामुळे दिनांक 18 नोव्हेंबर रोजी आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर त्यांची बायपास शस्त्रक्रिया दिनांक 23 नोव्हेंबर शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत करून यशस्वी केली त्यांना 30 नोव्हेंबर रोजी हॉस्पिटल मधून सुट्टी देण्यात आली काही दिवसात नजमा पटेल या कुणाचाही आधार न घेता चालत घरी गेले डॉक्टर प्रणव माळी यांना भूलतज्ञ डॉक्टर विजय कर्डिले सर यांचे सहकार्य लाभले यामुळे बायपास ऑपरेशनला भीतीचे काही कारण नसून हृदयाची बायपास शस्त्रक्रिया एखाद्याचा हृदयविकाराचा धोका कमी करू शकते. हृदयाची बायपास शस्त्रक्रिया ही प्रभावशाली असून या पद्धतीविषयी जागरूकता निर्माण करणे अत्यावश्यक आहे या उपचारा पद्धती नंतर छातीत दुखणे श्वासोच्छ्वास अडचणी येणे छातीत घट्टपणा आणि थकवा यांसारख्या लक्षणांमध्ये सुधारणा होते अशी माहिती आत्मा मालिक हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ञ डॉक्टर प्रणव माळी यांनी दिली रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टर प्रणव माळी सर व आत्मा मलिक हॉस्पिटल व्यवस्थापन व नर्सिंग स्टाफ यांचे आभार मानले आहे.आत्मा मालिक हॉस्पिटल टोल फ्रीनं-18003095040