Uncategorized

छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वांना सोबत घेऊन मार्गक्रमण करण्याची गरज – सुरज तुवर

संपादक मनिष जाधव 9823752964

Adds

छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वांना सोबत घेऊन मार्गक्रमण करण्याची गरज – सुरज तुवर

कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त हिंदुस्तानात नव्हे तर संपूर्ण जगात एक आदर्श राजा, कैवारी होते असे प्रतिपादन कोपरगांव तालुक्यातील महान शिव व्याख्याते सूरजजी तूवर सर यांनी संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली तेव्हा केले! आज आपण डी. जे च्या तालावर ठेका धरून आपल्या या महान राजाची जयंती साजरी करतो हे कितपत योग्य आहे. केवळ 19 फेब्रुवारीला फक्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणे अपेक्षित नाही तर महाराज कसे वागले, सर्व तळागाळातील लोकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य कसे निर्माण केले हे पाहणे आवश्यक आहे.. जाती, धर्म, पंथ हा रोग आज संपूर्ण भारतात लागला आहे त्यामुळे परकीय शक्ती आज घुसखोरी करत आहे.

ख

Adds 3

आजची जिजामाता तोंडाला मेकअप करून, भारी बाईक वर स्वार होऊन मोबाईल फोन घेऊन वावरते हे योग्य आहे का? असे अनेक चांगले/वाईट प्रसंग सांगुन सुरज तुवर सर यांनी शाळेतील सर्व विद्यार्थि आणि शिक्षक वृंद यांना आपल्या भाषण शैलीतून उद्बोधन केले! जवळ जवळ एक तास त्यांनी महाराजांचा इतिहास आणि वास्तव समोर मांडला होता.. या प्रसंगी उपस्थित शाळेचे प्राचार्य मोहसिन शेख सर यांनी त्यांचा सत्कार केला होता.

Sai

या कार्यक्रमाचे आयोजन सदर शाळेच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ. रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांनी केले. या प्रसंगी शाळेचे के. जी पासून दहावी पर्यंत चे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.. सूत्र संचलन शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले तसेच अब्जालखान वध नाटिका सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली ते प्रायमरी चे चिमुकले शाळेच्या शिक्षिका सौ. सूर्यवंशी मॅडम यांनी नियोजन केले होते.. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक अनुप गिरमे, सचिन पाटसकर, शेख मॅडम, विशाल परजणे, स्मिता दरेकर, उगले, बहिरट, बोळिज, उमेश परजणे शाळेतील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!