Uncategorized

23 डिसेंबरला कोपरगांव तालुक्‍यात सर्व गावांमध्ये एकाच वेळी ई-पीक पाहणी – संदीपकुमार भोसले तहसीलदार

संपादक मनिष जाधव 9823752964

Q

23 डिसेंबरला कोपरगांव तालुक्‍यात सर्व गावांमध्ये एकाच वेळी ई-पीक पाहणी – संदीपकुमार भोसले तहसीलदार

कोपरगाव मनिष जाधव – माहे- आक्टोंबर 2023 पासून रब्बी हंगामास सुरुवात झालेली आहे. सर्व शेतक-यांना यापुढे अँड्रॉईड मोबाईलवर पीकपाहणी ॲप डाऊनलोड करुन रब्बी हंगामातील पिकांची पीकपाहणी करावयाची आहे. ई- पीकपाहणी केल्यामुळे शेतक-यांना नैसर्गिक आपत्ती आल्यास पिक विमा व इतर सवलतीचा लाभ देणेस शासनास मदत होते त्यामुळे सर्व शेतक-यांनी ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे.  ऑनलाईन पीकपाहणी बाबत शेतकरी यांना पुरेशी माहिती नसलेमुळे तहसिल कार्यालय कोपरगांव चे वतीने एक दिवसीय अभिनव उपक्रम चला शेतात जाऊ या, पीक पाहणी करूया” शनिवार दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी राबविण्यात येणार आहे. या दिवशी कोपरगांव तालुक्‍यातील सर्व गावांमध्ये एकाच वेळी ई- पीकपाहणी करण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी दिली.
R
अ
सदर उपक्रमासाठी नायब तहलिसदार, सर्व तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक हे गावी हजर राहून खातेदारांना ई- पीकपाहणी ॲप कसा डाऊनलोड करावा व कशा पध्दतीने ई- पीकपाहणी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवून ई- पीकपाहणी करण्यात मदत होणार आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात हजर राहून पीक पाहणी नोंदविण्याचे आवाहन मा.उपविभागीय अधिकारी शिर्डी भाग शिर्डी तसेच तहसिलदार कोपरगांव यांच्या वतीने करण्यात आले आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या अँड्रॉइड मोबाईल वर ई- पीक पाहणी ॲप घेवून पीक पाहणी करावी. तसेच अडचण असल्यास आपल्या गावचे तलाठी यांचेशी संपर्क साधावा. हजर राहून आपला अँड्रॉइड मोबाईल सोबत असणे गरजेचे असल्याचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी सांगितले.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

× आपणांस काय सहकार्य करू