Uncategorized

ॲड. संदीप वर्पे यांच्यात शहराचा सर्वांगीण विकास करायची धमक – काका कोयटे

संपादक मनिष जाधव 9823752964

अ
ॲड. संदीप वर्पे यांच्यात शहराचा सर्वांगीण विकास करायची धमक – काका कोयटे 
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात ॲड. संदीप वर्पे यांचे मोठे योगदान आहे हे त्यांच्या नुकतीच झालेल्या निवडी वरून सर्वांच्या समोर आहे. त्यांच्या कामकाजाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर राज्य पातळीवर जवाबदारी दिली आहे. ॲड. संदीप वर्पे हे सर्व सामान्यांच्या ऐका हाकेला धावून जाणारे आहे. शहराच्या भल्यासाठी कधीही आणि कुठेही उभा राहणारे दमदार व्यक्ती म्हणून ओळखले जात असुन ॲड. संदीप वर्पे मध्ये शहराचा सर्वांगीण विकास करायची व प्रश्न सोडविण्याची धमक असल्याचे मत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी व्यक्त केले.
Ka
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत नुकतीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष ॲड.संदीप वर्पे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘ प्रवक्ता ‘ पदी नियुक्ती जाहिर केली. झालेल्या नियुक्ती बद्दल ॲड.संदीप वर्पे यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ॲड.संदीप वर्पे यांची नियुक्ती म्हणजे कोपरगावसह अहमदनगर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. समता परिवार च्या वतीने महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी तर व्यापारी महासंघाच्या वतीने सुधीर डागा यांच्या हस्ते ॲड.संदीप वर्पे यांची नियुक्ती झाल्याबद्दल विशेष सन्मान केला.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!