हिंदी भाषेमुळे राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक वारसा जपणे शक्य : प्रा डॉ संजय बी चोरडिया
‘सूर्यदत्त‘मध्ये कृतिशील हिंदी महिना उत्साहात साजरा
पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने हिंदी महिना साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाची सुरुवात १४ सप्टेंबर रोजी करण्यात आली तर सांगता १४ ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यात आली . राष्ट्रभाषा हिंदी महिना साजरा करण्याची कल्पना प्रा डॉ संजय बी चोरडिया यांनी मांडली . सूर्यदत्त गुप ऑफ इन्स्टिट्यूट्स च्या विविध संस्थांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदविला. सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या विद्यार्थी व शिक्षकांनी हिंदी महिन्याची सुरुवात पिवळ्या रंगाचा पोशाख परिधान करून केली . विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे महत्व पटवून देण्यात आले.डॉ. सीमी रेठरेकर म्हणाल्या, “१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि १४ सप्टेंबर १९४९ रोजी हिंदी भाषेला राष्ट्रभाषा म्हणून मान मिळाला. हिंदी महिन्यानिमित्त भाषेविषयीचे प्रेम मुलामध्ये रुजवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत .”

सुषमा चोरडिया उपाध्यक्ष सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी म्हणाल्या, “आपण सर्वांनी इतर भाषांप्रमाणेच हिंदी भाषेचा उपयोग जास्तीत जास्त करायला हवा. हिंदी भाषेला भारतात एक विशेष दर्जा आहे, तो आपण जपला पाहिजे. आपले पंतप्रधान आंतरराष्ट्रीय स्तरावरही हिंदी भाषेचा वापर करतात. ही गोष्ट आपण सर्वांनी आत्मसात केली पाहिजे. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असून, तिचा मान आपण सर्वांनी राखला पाहिजे.” यावेळी त्यांनी संत कबीरांचा वेळेचे व्यवस्थापन या विषयावर आधारित दोहा सादर केला. संपूर्ण महिन्यात बॅचलर ऑफ फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी संत कबीर यांचे दोहे व हिंदी कवितांचे वाचन केले. डॉ. अंजली बैस यांनी वैद्यकीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले . विद्यार्थ्यांनी हिंदी गीत गायनाचा आनंद घेतला.

सूर्यदत्त नॅशनल स्कुल च्या वतीने जीव जगत तसेच प्रकृती या विषयावर कविता वाचन , गुरु माता पिता आणि देशभक्ती या विषयावर कविता आणि गोष्टी वाचन , पंचतंत्र , जातक कथा , अकबर बिरबल कथा यांचे वाचन आणि कविता वाचन , हिंदी सुलेखन स्पर्धा , हिंदी महिना चार्ट बनविणे , घोषवाक्य स्पर्धा ,जीवन कथा तसेच ज्ञान प्राप्ती च्या अनुशंघाने विज्ञान कथा , हिंदी साहित्यिक , कवीचा परिचय इत्यादी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनॅजमेण्ट इन्फॉरमेशन रिसर्च अँड टेकनॉलॉजी (एससीएमआयआरटी ) आणि सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेज च्या संयुक्त विद्यमाने महाभारत मधील प्रसंगावर आधारित नाट्य , भव्य काव्य हा कवितांचा कार्यक्रम तसेच हिंदी साहित्यकार यांच्यावरील माहितीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . अशाच प्रकारे इतर संस्थांच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . या मध्ये आर्टीफिसिअल इंटेलिजिएन्स चा वापर योग्य कि अयोग्य , राजभाषा हिंदी चे महत्व अशा विषयावर वाद विवाद स्पर्धांचे हि आयोजन करण्यात आले होते .

हिंदी ही एकात्म भाषा आहे जी राष्ट्रीय एकात्मता वाढवताना सांस्कृतिक वारसा जपण्यास मदत करते. देशातील विविध प्रांतातील नागरिकांमध्ये हिंदी हे संवादाचे एक सामान्य माध्यम आहे. भारताचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हिंदीचा अवलंब करून त्याचा प्रसार करणे आवश्यक आहे. आधुनिक भारतात हिंदीला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण, माध्यम आणि भाषा तंत्रज्ञानाचा अवलंब हे काही मार्ग आहेत. त्यामुळे भाषेची प्रासंगिकता टिकवून ठेवण्यास आणि डिजिटल युगात भाषेची वृद्धी होण्यास निश्चित मदत होईल असे मत प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी समारोप प्रसंगी व्यक्त केले .

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया संस्थापक व अध्यक्ष ,सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन, सुषमा चोरडिया उपाध्यक्ष , स्नेहल नवलखा सहयोगी उपाध्यक्ष, संचालक , विभागप्रमुख यांच्यासह सर्व विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.