हा तर सत्याचा विजय – आकाश नागरे
राहुल गांधींच्या दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती
कोपरगावमध्ये काँग्रेसने केला जल्लोष
कोपरगाव प्रतिनिधी – काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात हायकोर्टाने ठोठावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती मिळाल्याच्या निर्णयामुळे त्यांची खासदारकी पुन्हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असे चित्र स्पष्ट होताच कोपरगांव येथे काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.
या वेळेस बोलताना कोपरगाव तालुकाध्यक्ष आकाश नागरे म्हणाले की, आजचा दिवस हा संपूर्ण देशातील काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी आणि लोकशाही विचारधारेला मानणाऱ्या लोकांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. राहुलजी गांधी यांना गुजरात हायकोर्टाने ठोठावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, हा तर सत्याचा विजय आहे.
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत भाषण देतांना सांगितले होते की आपली राज्यघटना चांगली की वाईट हे ही राज्यघटना कोणाच्या हातात जाते यावर अवलंबून आहे.
काँग्रेस नेते आदरणीय राहुल गांधी यांच्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आजचा निकाल हेच सांगतो की अजूनही आपली राज्यघटना सर्वोच्च न्यायालयाच्या हातात सुरक्षित आहे. सत्य परेशान हो सकता है, सत्य पराजित नही हो सकता, हेच या निर्णयातून सिद्ध झाले असल्याचे काँग्रेस तालुकाध्यक्ष आकाश नागरे म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल केवळ राहुल जी गांधी यांनाच नव्हे तर सर्व नागरिकांना दिलासा देणारा आहे. यावेळी कोपरगांव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश नागरे, किसान काँग्रेस अध्यक्ष विष्णु पडेकर, अल्पसंख्यांक अध्यक्ष छोटूभाई पठाण, यादवराव त्रिभुवन, तालुका सचिव रवींद्र साबळे, विजय मोरे, शब्बीर शेख, योगेश पोकळे, प्रशांत अहिरे, राहुल गवळी, दत्ता बिडवे, विजय थोरात, महेश जगताप, काँग्रेसचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.