हक्क गाजविताना नागरिकांनी कर्तव्याची जाणीव ठेवावी – विमल पुंडे
कोपरगाव : नगरपरिषद सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सेवा मिळण्यासाठी आपण नागरिक नेहमी हक्काने बोलत असतो. त्यांच्या झालेल्या चुकांबद्दल आपण आक्रमक होऊन तीव्र आक्षेप घेत असतो. पण त्यासोबत आपण नागरिक आपले कर्तव्य विसरतो. वेळेवर कर भरणे हे आपलं कर्तव्य आहे. कारण या करातूनच नगरपालिका नागरिकांसाठी आरोग्य, पाणीपुरवठा, बांधकाम, रस्ते, आदी सुविधा आणि विविध विविध विकास कामे करते. तेव्हा आपण नागरिकांनी हे आपलं गाव आहे. ही आपली संस्था आहे. आपल्याला कर भरणे चुकणार नाही. उलट उशीरा दंडासह तो कर भरावा लागतो. त्यासाठी आपण सर्व जण नियमित कर भरु या व नगरपालिकेला सहकार्य करू या. असे आवाहन शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमल दत्ता पु़ंडे यांनी केले आहे.

कोपरगाव शिवसेनेच्या (बाळासाहेबांची) वतीने पालीकेचा कर भरण्यासाठी समाजात प्रबोधन करण्यात येत आहे.यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रथम स्वतःच्या नावावर असलेला कर पालिकेत कर भरून, या सामूहिक कर भरण्याचा कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना करापोटी धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमल पुंडे, शहरप्रमुख अक्षय जाधव, माजी शहर प्रमुख दत्ता पुंडे, जिल्हा उपप्रमुख मनील नरोडे, युवा सेना शहर प्रमुख सनी गायकवाड, नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक सुनील आरणे साहेब, मार्केट विभागाचे रविंद्र वाल्हेकर हे या कामी मोठे परिश्रम घेत आहेत.