Uncategorized

सोयाबीनवर पिवळ्या मोझॅकचा प्रादुर्भाव ; कृषी विभागाने जनजागृतीचे नियोजन करावे – आकाश नागरे

संपादक मनिष जाधव 9823752964

आकाश

सोयाबीनवर पिवळ्या मोझॅकचा प्रादुर्भाव कृषी विभागाने जनजागृतीचे नियोजन करावे – आकाश नागरे

कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव तालुक्यात अनेक भागात सोयाबीन पिकांवर पिवळ्या मोझॅकचा (केवडा) प्रादुर्भाव दिसून येत आहे. या घटनेत शेतकरी मात्र हतबल झाला आहे. शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन पीक चांगले आणुन देखील या रोगांमुळे उत्पादनात घट होणार असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले असून कृषी विभागाने याबाबत शेतकऱ्यांना रोगाची ओळख व व्यवस्थापन कसे करावे या बाबत मार्गदर्शन करण्याची गरज असुन तातडीने जनजागृती मोहीम राबवावी अशी मागणी कोपरगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आकाश नागरे यांनी कृषी विभागाकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

पिवळा

तालुक्यात कोपरगाव, सुरेगाव, दहेगाव, रवंदे, पोहेगाव असे एकूण पाच महसूल मंडळ आहेत या मंडळात २५ हजार ४९५ हेक्टर सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे पडलेल्या पाऊस यामुळे शेतकऱ्यांना समाधान चे वातावरण असताना दुसरीकडे सोयाबीन पिकांवर मोझॅक (केवडा ) या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे यावर्षी चांगला पाऊस पडेल या पार्श्वभूमीवर शेतकरी उत्साहात होता अशाच पावसाने धोका दिला आणि मृग नक्षत्रासह सुरुवातीस नक्षत्र कोरडी केल्याने शेतकऱ्यांची पीक मागे पुढे झाले आदर मधून आलेल्या पावसाने पीक निघाले आणि पिकांची वाढ झाली आता पिकाला फुलोर आणि शेंगा पकडण्याचा कालावधी सुरू आहे मात्र याच कालावधीत पीक पिवळे पडून भाजल्यासारखे दिसू लागले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बी बियाणे रासायनिक खते मशागत मजुरीवर शेतकऱ्यांचे लाखो रुपये खर्च होत असून शेतकरी आर्थिक अडचणीत व कर्जबाजारी होत आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!