सोनवणे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत मोफत चष्मा वाटप.
अंदरसुल सचिन सोनवणे -दिनांक – 21 ऑक्टोबर 2024. वार- सोमवार रोजी अंदरसुल येथील मातोश्री. शांताबाई गोविंदराव सोनवणे माध्यमिक विद्यालयातराष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत मोफत चष्मा वाटप करण्यात आले. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना दृष्टीदोष आढळून आल्यास ,त्यांना वरील कार्यक्रमांतर्गत मोफत चष्मा वाटप करण्यात आले.
त्याप्रसंगी आरोग्य पथक- उपजिल्हा रुग्णालय येवला.डॉ. नितीन जाधव, डॉ. स्वाती शेळके ,रामेश्वरी कडलग व ज्योती कुबेरजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री.आर .बी .गायकवाड सर यांनी स्वीकारले. तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका -सौ.जयश्री परदेशी व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य- श्री.सचिन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमासाठी सर्व वर्गशिक्षक व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.याप्रसंगी दिपाली सोनवणे, सुषमा सोनवणे, सुवर्णा मस्के, कांचन गायकवाड, अपर्णा शिंदे, मयुरी टेके, वैशाली शिंदे, सुजाता भागवत,सोनाली पाटोळे, ऋतुजा बोडके, निर्मला शिकारे, सुप्रिया कुळधर, महेश म्हेत्रे, संतोष जाधव, जितेश व्यवहारे, सुनील सपकाळ, गोकुळ वाणी, सचिन बोढरे, संदीप बोढरे, मयूर भागवत, विजय भाटे, सत्यजित गायकवाड, शिवप्रसाद शिरसाठ व गणेश आमोदकर तसेच शिक्षक व कर्मचारी यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी व चष्मा वाटप चा कार्यक्रम राबविण्यात आला.